Vastu Tips In Marathi | मुंबई : हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन-संपत्तीची देवता मानली जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला पैशाची आणि अन्नाची कधीच कमतरता भासत नाही. प्रत्येकाला भरपूर पैसे कमवायचे असतात आणि सर्व सुख-सुविधा मिळाव्यात असे वाटत असते. यासाठी कष्टासोबतच लोक विविध उपायांचा अवलंब करतात. (The hints that Lakshmi gives before coming home, Know Your Upcoming 'Good Days').
अधिक वाचा : पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित
असे मानले जाते की माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय व्यक्ती धन कमवू शकत नाही. जिथे माता लक्ष्मीचा वास असतो तिथे सदैव सुख-समृद्धी राहते. तसेच अशा व्यक्तीला संपत्तीची कधीही कमतरता नसते. मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा माता लक्ष्मी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करणार असते तेव्हा ती काही संकेत देते. चला तर मग जाणून घेऊया माता लक्ष्मीच्या आगमनापूर्वी प्रथम व्यक्तीला कोणत्या प्रकारचे संकेत दिले जातात.
जर अचानक काळ्या मुंग्या तुमच्या घरी आल्या आणि थवा बनवून काही खायला लागल्या तर असे मानले जाते की लवकरच त्या व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे.
घरात एकाच ठिकाणी तीन पाल दिसल्या तर ते खूप शुभ लक्षण आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे. या व्यतिरिक्त मान्यतांच्या आधारे, जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताला सतत खाज येत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला धन मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला तुमच्या घरात पक्षी घरटे बांधताना दिसले तर ते खूप चांगले लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत.
कोणाला झाडू, घुबड, घागरी, बन्सी, हत्ती, सरडा, शंख, नाग, गुलाब अशा वस्तू स्वप्नात दिसल्या तर ते शुभ आहे. जर चांदण्या दिसत असतील तर ते शुभ चिन्ह आहे, याचा अर्थ व्यक्तीला धन मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर याचा अर्थ असा की तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे. सोबतच यामुळे माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मिळतात.