Gemology: नशीब बदलून टाकतात ही 4 रत्ने, धारण केल्याबरोबर वाढू लागतो व्यक्तीचा बँक बॅलन्स

Astrology : ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि शुभ प्रभाव वाढवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये रत्न (Gem Stone)घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रात रत्न खूप प्रभावी मानले जातात. रत्न धारण केल्याने माणसाचे बंद नशीबही बदलते. अशुभ ग्रहांमुळे तुम्हालाही आर्थिक तंगीचा (Financial Problem) सामना करावा लागत असेल किंवा मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर रत्न शास्त्रात चार रत्ने सांगितली आहेत.

Effect of Gem stones
ज्योतिषशास्त्रात रत्नांचे महत्त्व, पालटते नशीब 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अशुभ ग्रहांचा जबरदस्त प्रभाव असतो
  • शुभ प्रभाव वाढवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये रत्न घालण्याचा सल्ला जातो
  • रत्ने धारण केल्याने व्यक्तीचे बिघडलेले नशीबही जागृत होते

Powerful Gem Stone: नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि शुभ प्रभाव वाढवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये रत्न (Gem Stone)घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रात रत्न खूप प्रभावी मानले जातात. रत्न धारण केल्याने माणसाचे बंद नशीबही बदलते. अशुभ ग्रहांमुळे तुम्हालाही आर्थिक तंगीचा (Financial Problem) सामना करावा लागत असेल किंवा मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर रत्न शास्त्रात चार रत्ने सांगितली आहेत. ते धारण केल्याने व्यक्तीचे बिघडलेले नशीबही जागृत होते. या रत्नांबद्दल जाणून घेऊया. (These 4 gem stones change the fortune of the person, bank balance rises as you wear it)

अधिक वाचा : Weekly Horoscope 16 to 22 May 2022 : या आठवड्यात तुमचे स्टार काय सांगतायत, जाणून घ्या कोणाचे नशीब उजळणार

ही रत्ने धारण केल्याने नशीबाचे दरवाजे उघडतात-

1. सुवर्ण रत्न-

घरात लक्ष्मीची कृपा कायम राहावी आणि पैसा येत राहावा यासाठी सुवर्ण रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. गुरु बृहस्पती हे सुवर्ण रत्नाचे मालक आहेत. तसेच ते पुखराजाचे उर्रत्न आहे. त्यामुळे हे रत्न धारण केल्याने धन आणि धान्यात वृद्धी होते. यानंतर व्यक्तीचे नशीब हळूहळू उघडते.

2. जेड स्टोन-

रत्नशास्त्रातील आणखी एक रत्न, जेड स्टोन ड्रीम स्टोन म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की जेड स्टोनमध्ये एखाद्या व्यक्तीची स्वप्ने सत्यात उतरवण्याची शक्ती असते. ते परिधान केल्याने व्यक्ती स्वावलंबी, धैर्यवान बनते. तसेच, नशीब उजळण्यास देखील हे उपयुक्त आहे. हे धारण केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

अधिक वाचा : 23 मेनंतर शुक्राची बदलेल चाल, या राशींसाठी येणार अच्छेदिन

3. मक्षिक रत्न-

धनलाभासाठी मक्षिक रत्न खूप फायदेशीर मानले जाते. हे एक प्रकारचे खनिज घटक मानले जाते, जे सल्फरपासून मिळते. रत्नशास्त्रानुसार ते धारण केल्याने व्यक्तीची बौद्धिक क्षमता विकसित होते. तसेच, व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर ती देखील पूर्ण होते. शुक्रवारी हे रत्न धारण केल्याने व्यक्तीला धनाची प्राप्ती होते.

4. टायगर स्टोन-

ज्योतिषशास्त्रानुसार या रत्नामुळे धैर्य आणि आत्मविश्वास येतो. प्रत्येक कामात यश मिळते. असे मानले जाते की हे रत्न धारण केल्याने व्यक्तीचे बिघडलेले नशीब जागृत होते. भाग्य उजळते आणि प्रगती होते. तो माणूस प्रगतीच्या पायऱ्या चढतो. टायगर स्टोन धारण केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य आणि चंद्र बलवान होतात. ते सोमवारी धारण करावे असे म्हणतात.

अधिक वाचा : Coconut: या कारणांमुळे महिला शुभ कार्यात फोडत नाहीत नारळ

चंद्रग्रहणाच्या (Lunar eclipse) एका दिवसानंतर मंगळ (Mangal)(Mars) 40 दिवस मीन राशीत जाणार आहे. अशा स्थितीत या ग्रहाच्या राशी बदलामुळे अनेक राशींमध्ये (Rashi Parivartan)बदल होण्याची शक्यता आहे, परंतु तीन राशी (Zodiac Signs) आहेत, ज्यांना मंगळाच्या बदलामुळे खूप फायदा होणार आहे. त्यांच्या नशिबात लाभाची चिन्हे आहेत. तुमच्या माहितीसाठी, तुमच्या राशीमध्ये मंगळ चांगला असेल तर उत्साह, ऊर्जा आणि संपत्ती वाढते. मंगळ 17 मे रोजी म्हणजेच सकाळी 9 वाजता चंद्रग्रहणानंतर एक दिवस मीन राशीत प्रवेश करेल आणि 27 जूनपर्यंत या राशीत राहील.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ कोणत्याही प्रकारची सूचना किंवा पुष्टी करत नाही.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी