Navratri 2022: नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या गोष्टी...येऊ शकतात मोठ्या समस्या

Navratri Rules : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापनाही केली जाते. जाणकार सांगतात की या दिवसांमध्ये दुर्गा मातेची कृपा त्यांच्या भक्तांवर भरपूर असते. देशभरात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. अनेकजण या दिवसांमध्ये उपवास करतात. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही अशी कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई आहे.

Navratri 2022
नवरात्रीचे नियम 
थोडं पण कामाचं
  • नवरात्रीमध्ये देशभरात दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
  • भारतीय परंपरेतील लोकप्रिय उत्सवांपैकी नवरात्र एक उत्सव आहे.
  • नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी टाळायच्या ते पाहूया

Mistakes to be avoided in Navratri : नवी दिल्ली : लवकरच नवरात्र उत्सवाची सुरूवात होणार आहे. भारतीय परंपरेतील लोकप्रिय उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. दुर्गा मातेचे भक्त वर्षभर नवरात्रीची (Navratri) वाट पाहत असतात. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देशभरात दुर्गा मातेच्या (Durga) मूर्तीची स्थापना केली जाते. यासोबतच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापनाही केली जाते. जाणकार सांगतात की या दिवसांमध्ये दुर्गा मातेची कृपा त्यांच्या भक्तांवर भरपूर असते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सुख-शांती कायम राहते. यासोबतच घरातील आशीर्वादाचे मार्ग सतत खुले होतात. पण शास्त्राचे जाणकार असेही सांगतात की, नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही अशी कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई (Navratri Rules) आहे. ही कामे केल्यास नवरात्रीच्या पूजनाचे फळ मिळणार नाही. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नयेत. (These things should be avoided in Navratri)

अधिक वाचा : Bhuvneshwar Kumar च्या बचावासाठी बायकोने खोचला पदर, रिकामटेकड्यांना सुनावले खडे बोल

नवरात्रीच्या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते पाहा-

घर एकटे सोडू नका किंवा बंद ठेवू नका

नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करून घरात कलशाची स्थापना केली असेल तर चुकूनही घर बंद ठेवू नका किंवा घर एकटे सोडू नका. यासोबतच जाणकार म्हणतात की जर तुम्ही उपवास ठेवला असेल तर दिवसा झोपणे टाळा.

मुलींना आनंदी ठेवा

हिंदू धर्मात मुलींना किंवा महिलांना दुर्गा मातेचच रूप मानले जाते. त्यामुळे या काळात विसरुनही मुलींचे मन दुखवू नये. जाणकारा म्हणतात की शास्त्रात सांगितले आहे की कोणत्याही मुलीचा अपमान केल्याने किंवा त्यांना चुकीची वागणूक दिल्याने दुर्गा माता कोपते.

अधिक वाचा : IND vs AUS: दुसऱ्या टी-२० आधी मोठी दुर्घटना, ४ रुग्णालयात दाखल

वादांपासून स्वतःला दूर ठेवा

नवरात्रीच्या काळात मन स्वच्छ ठेवावे. या दिवसांमध्ये लोकांना त्यांच्या चुकीबद्दल क्षमा केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहिले पाहिजे. शास्त्रातही असं म्हटलं आहे की, कलह किंवा वाद असलेल्या घरात लक्ष्मी मातेचे वास्तव्य क्षणभरही राहत नाही.

अधिक वाचा : टीम इंडियासाठी नागपूरहून वाईट बातमी !, रोहित शर्माच्या मनसुब्यावर फिरणार पाणी का?

लसूण, कांदा आणि मांसाहाराचे सेवन करू नका 

नवरात्रीच्या पवित्र दिवसात सात्त्विक आहार घ्यावा. वागण्यात आणि विचारात सात्त्विकता आणावी. नवरात्रीच्या उत्सवाच्या काळात कांदा, लसूण, मांस आणि मद्य या सर्व गोष्टींपासून दूर राहावे. यासोबतच नवरात्रीमध्ये दाढी, नखे आणि केस कापणेही टाळावे.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी