Chanakya Niti: पोरांना या तीन गोष्टी बिघडवतात, सवय जडली तर आयुष्याचं होतं सत्यानाश

प्राचीन राज्यशास्त्रज्ञांमध्ये (Political scientist) आर्य चाणक्य (Chanakya) ऊर्फ कौटिल्य ऊर्फ विष्णूगुप्त यांचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या बुद्धिमान आणि कुशल विचारांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारणाची सरळ साधी व्याख्या केली आहे. भारतवर्षामध्ये आचार्य चाणक्य यांना एक थोर समाजसेवक (social worker) आणि अभ्यासक (scholar) मानलं जाते.

Chanakya Niti
पोरांना या तीन गोष्टी बिघडवतात, सवय जडली तर आयुष्याचं होतो सत्यानाश   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तरुणांना यशस्वी व्यक्ती बनवायचे असेल तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
  • आळस तरुणांना यशस्वी होण्यापासून रोखत असते.
  • यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे राग. क्रोध व्यक्तीच्या बुद्धी कमकुवत करते असते.

Chanakya Niti: प्राचीन राज्यशास्त्रज्ञांमध्ये (Political scientist) आर्य चाणक्य (Chanakya) ऊर्फ कौटिल्य ऊर्फ विष्णूगुप्त यांचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या बुद्धिमान आणि कुशल विचारांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारणाची सरळ साधी व्याख्या केली आहे. भारतवर्षामध्ये आचार्य चाणक्य यांना एक थोर समाजसेवक (social worker) आणि अभ्यासक (scholar) मानलं जाते. आचार्य चाणक्यांनी पती-पत्नी, तरुण-तरुणी, राजकारणी, आई-वडील यांच्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येकांना आपल्या चाणक्य नीतिशास्त्रातून मार्गदर्शन केलं आहे. (These three things spoil youths life, if gets habit ingrained, life becomes annihilation)

आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अनेक पैलूंबद्दल लोकांना मार्गदर्शन केले आहे. समाजशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धनीती, अध्यात्मशास्त्र या विषयांतील त्याचं ज्ञान अलौकिक होतं. आपल्याला समाजात जगण्यासाठी एक मार्ग मिळावा, यासाठी त्यांनी नीतिशास्त्र लिहिलं आहे. त्याला आपण चाणक्य नीति म्हणत असतो. यात त्यांनी युवकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या करू नये. याचे देखील मार्गदर्शन केलं आहे. कोणत्या गोष्टींची सवय युवकांना झाली तर त्यांचं जीवन हे नरकात जाण्यासारखं असतं याविषयीही त्यांनी लिहून ठेवलं आहे. आचार्य चाणक्य यांनी त्याकाळी सांगितलेली नीति आज आपल्याला लागू पडत असते. आज आपण अशा गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत, ज्याची सवय झाली तर तरुणांचे जीवन खराब होत असते. 

Read Also : हार्बर मार्ग खुला तर मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक

युवक हे देशाचे भविष्य आहेत, त्यांना सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे जीवन समृद्ध होते. परंतु तारुण्यात अनेकदा असा टप्पा येतो ज्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या व्यक्तीला विचलित करण्याचे काम करतात. चाणक्य म्हणतात की तरुणांना यशस्वी व्यक्ती बनवायचे असेल तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत, अन्यथा वर्तमानासह भविष्यही खराब होईल. यामुळे चाणक्याने तरुणांना त्या गोष्टीपासून दूर राहण्यास सांगितले आहे 

 आळस

तरुण पिढीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस. तारुण्यात कष्ट केले तर म्हातारपण सुधारते असे म्हणतात. परंतु जर तुमच्याकडे आळस असला तर तुम्ही म्हातारपण काय साधं तारुण्याचे जीवनही खराब करत असतात. चाणक्य म्हणतात की आळस तरुणांना यशस्वी होण्यापासून रोखत असते. माणूस जितका शिस्तप्रिय असेल तितकी प्रगती त्याच्या पायांचे चुंबन घेत असते. वेळ खूप मौल्यवान आहे, त्याचा योग्य वापर करा. तारुण्यात केलेला संघर्ष लोकांचे भविष्य सुधारतो. तुम्ही आळसातून काहीही कमवू शकणार नाही. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सदैव सक्रिय असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

Read Also : आज राज्यातल्या 'या' जिल्ह्यांसाठी Yellow Alert जारी

राग- क्रोध

यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे राग. क्रोध व्यक्तीच्या बुद्धी कमकुवत करते असते. तरुण असो वा लहान, रागामुळे सर्वांचेच नुकसान होते. रागावर नियंत्रण ठेवायला शिका नाहीतर तुमची एक चूक तुमचे करिअर खराब करू शकते. राग तरुणांच्या प्रगतीत अडथळा आणतो. जर तुमचा स्वभाव रागीट असेल तर त्यांच्या फायद्यासाठी तुमच्या वागण्याचा फायदा इतरही घेऊ शकतात.

संगत

चांगल्या आणि वाईट संगतीचा मानवी जीवनावर खूप परिणाम होतो. चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे व्यक्तीमध्ये वाईट कृत्ये करण्याची विचारसरणी निर्माण होते. नशा, सेक्स, भांडण या गोष्टींपासून जितके अंतर ठेवाल तितके यश जवळ येईल. तारुण्यात संगत व्यक्तीची दिशा आणि स्थिती ठरवते, कारण या वयातील लोकांना स्वतःचे चांगले-वाईट समजू लागते. दरम्यान या चुकीच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी