Diwali 2022: अनेक वर्षांनी दिवाळीनंतर येतोय एक अद्भूत योग...होणार ग्रहांचा खास संयोग... पाहा कोणत्या राशींचे बदलणार भाग्य

Astrology 2022 : भविष्यातील पंचांगानुसार यंदा दिवाळीचा सण 24 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. कारण या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यंदाच्या दिवाळीत ग्रहांचा विशेष योग आहे. या स्थितीचा या ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होत आहे. मात्र 3 राशी (Zodiac Signs) अशा आहेत, ज्यांना या काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. भारतीय परंपरेत ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे.

Astrology 2022
ज्योतिषशास्त्र 2022 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीनंतंर ग्रहांचा होणार अद्भूत संयोग
  • राशींना असणार अनूकूल स्थिती
  • या राशींच्या लोकांचा होणार जबरदस्त फायदा

Astrology in Diwali 2022: नवी दिल्ली : दिवाळीचा (Diwali 2022) आनंदोत्सव सर्वत्र सुरू आहे. हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण असतो. भारतीय परंपरेत ज्योतिषशास्त्राचे (Astrology) मोठे महत्त्व आहे. खास करून सणासुदीच्या काळात याला खास महत्त्व असते. भविष्यातील पंचांगानुसार यंदा दिवाळीचा सण 24 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. कारण या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यंदाच्या दिवाळीत ग्रहांचा विशेष योग आहे. ग्रहांचा हा संयोग सुख-समृद्धी वाढीचे सूचक मानले जाते. कारण शनि, गुरू, बुध आणि शुक्र हे ग्रह आपापल्या राशीत बसले आहेत. या स्थितीचा या ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होत आहे. मात्र 3 राशी (Zodiac Signs) अशा आहेत, ज्यांना या काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नफा होण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते पाहूया... (These zodiac signs will have chance of prosperity this Diwali 2022)

अधिक वाचा :  WhatsApp वर तुम्हीही दररोज पाठवता Good Morning मेसेज? मग होऊ शकता बॅन

कोणत्या राशींचे भाग्य फळफळणार-

मकर : चार ग्रहांच्या उपस्थितीमुळे या काळात मकर राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण गुरु या राशीच्या तिसर्‍या घरात स्थित आहे आणि शनि या राशीच्या चढाईत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही समस्या सुटू शकते. त्याचबरोबर बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते.   तर नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बढती मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. 

तूळ: गुरु, शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांचे त्यांच्या स्वतःच्या राशीत होणारे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या राशीचे लोक या काळात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच  या राशीतील लोकांच्या कुंडलीत शश नावाचा राजयोग तयार होत आहे. ज्यामुळे त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तर लोह, पेट्रोल, तेल किंवा खनिजे या सारख्या व्यवसायत असणाऱ्यांना जबरदस्त लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. 

अधिक वाचा :  Car Tips: कार खरेदी करताना या टिप्स वापरल्या तर तुमची होईल लाखो रुपयांची बचत...पाहा कशी

वृषभ : या राशीतील लोकांसाठी ग्रहांची ही स्थिती अतिशय फायदेशीर आहे.  कारण यात कुंडलीत गुरु शुभ स्थानावर स्थित आहे. यामुळे या राशीतील लोकांचे उत्पन्न वाढू शकते. तसेच शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीद्वारे कमाईची संधी मिळू शकते. दुसरीकडे शुक्राच्या प्रभावामुळे आनंदात वाढ होईल. योग्य ग्रहस्थितीमुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची किंवा प्रगतीची शक्यता आहे. 

अधिक वाचा :  Iphone auction for record price: 15 वर्षांपूर्वीच्या आयफोनचा लिलाव, मूळ किंमतीच्या पन्नास पट लागली बोली

यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहुर्त सांयकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी हा मुहुर्त संपणार आहे. 1 तास 23 मिनिटांच्या कालवधीत लक्ष्मीपूजनचा मुहुर्त असणार आहे. प्रदोष काळ सायंकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी ते 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत. वृषभ काळ- सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी ते 8 वाजून 48 मिनिटांपर्यत असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी