Shani Effects: २ जुलैआधी या ४ राशींसाठी प्रमोशन-नव्या नोकरीचे योग, बदलणार नशीब

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 10, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shani Effects: जून २०२२मध्ये ग्रह-नक्षत्रांची स्थितीमध्ये मोठे बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम ४ राशींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. 

zodiac sign
२ जुलैआधी या ४ राशींसाठी प्रमोशन-नव्या नोकरीचे योग 
थोडं पण कामाचं
  • बुध वृषभ राशीत मार्गक्रमण करत आहे. हे या राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे
  • शनी आणि बुधच्या बदललेल्या चालीने मेष राशीच्या लोकांचे दिवस बदलणार.
  • शनी आणि बुधच्या चालीमधील बदल मिथुन राशीसाठी थांबलेली कामे पूर्ण होण्यास मदत करतील

मुंबई: जून महिन्याच्या(june month) सुरूवातीला २ मोठ्या बदलांसोबत झाली आहे. जून २०२२च्या पहिल्या आठवड्यात शनी आणि बुधसारख्या २ महत्त्वाच्या ग्रहांची चाल बदलत आहे. ३ जूनला बुध वृषभ राशीत मार्गक्रमण करत आहे आणि ५ जूनला शनी कुंभ राशीत वक्री झाला आहे. शनी(saturn) आणि बुधची(mercury) बदललेली चाल सर्व राशींच्या लोकांवर परिणामकारक ठरणार आहे. बुध पुढील एक महिना या स्थितीत राहणार आहे. 

अधिक वाचा - पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर कारवाई करणार तालिबान

या राशींच्या लोकांना होणार तगडा फायदा

मेष - शनी आणि बुधच्या बदललेल्या चालीने मेष राशीच्या लोकांचे दिवस बदलणार. या लोकांना नोकरी-व्यवसायात चांगलाच फायदा होणार आहे. काही लोकांना नवी नोकरी अथवा प्रमोशन मिळू शकते. धनलाभ होती. नवे घर अथवा गाडी घेऊ शकतात. नवे काम सुरू करण्यास चांगली वेळ आहे. 

वृषभ - बुध वृषभ राशीत मार्गक्रमण करत आहे. हे या राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. नव्या नोकरीच्या ऑफर मिळतील. इन्कम वाढेल. ज्या लोकांना प्रमोशन अथवा इन्क्रिमेंटची प्रतीक्षा होती त्यांची प्रतीक्षा संपेल. पुरेशा प्रमाणात पैसा हातात आल्याने आनंद होईल. अडकलेले पैसे मिळतील. भागीदारीने कामे होतील. धनलाभ होईल.. 

मिथुन - शनी आणि बुधच्या चालीमधील बदल मिथुन राशीसाठी थांबलेली कामे पूर्ण होण्यास मदत करतील. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाऊ शकता. व्यापाऱ्यांना कामे मिळतील. त्यांचा नफा वाढेल तसेच कामाचाही विस्तार होईल. 

अधिक वाचा - ट्रेनच्या इंजिनमध्ये घुसून केला प्रवास, थोडक्यात बचावला जीव

धनू - मार्गक्रमण करत असलेला बुध आणि वक्री शनी धनू राशींच्या व्यक्तींसाठी लाभ देणारे आहेत. आतापर्यंत थांबलेले प्रमोशन मिळू शकते. कामात यश मिळेल. जे लोक सरकारी नोकरीसाछी प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळेल. धनलाभ होतील. नव्या मार्गाने पैसा मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी