Astrology: तीन दिवसांनी या राशींचे उजळणार नशीब, बनतोय हा शुभ योग

धर्म-कर्म-भविष्य
Updated Sep 22, 2022 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zodiac sign: य़ावेळेस २५ ऑक्टोबरच्या दिवशी महालया अमावस्या येत आहे. या दिवशी चार ग्रहांचा शुभ योग बनत आहे. या ग्रहांपासून बनत असलेला शुभ योगाचा प्रभाव राशींवर पडणार आहे. खासकरून ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.

zodiac sign
तीन दिवसांनी या राशींचे उजळणार नशीब, बनतोय हा शुभ योग 
थोडं पण कामाचं
  • महालया अमावस्येला मेष राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे.
  • हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येणारा आहे.
  • सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय लाभदायक असणार आहे.

मुंबई: महालया अमावस्या(mahalaya amavsya) २५ ऑक्टोबर म्हणजेच रविवारच्या दिवशी येत आहे. या दिवशी चार ग्रहांचा(planets) शुभ योग निर्माण होत आहे. चंद्र(moon) या दिवशी सिंह राशीतून कन्या राशीत येणार आहे. यामुळे कन्या राशीत चार ग्रहांचा शुभ योग बनत आहे. या संयोगामध्ये बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगही सामील आहेत. या योगायोगाचा परिणाम प्रत्येक राशीवर पडेल मात्र खासकरून ५ राशींवर(zodiac sign) याचा सुखद परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी...This 5 zodiac sign luck will change after 3 days

अधिक वाचा - "..यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही"असं का म्हणाली गौरी खान?

मेष

महालया अमावस्येला मेष राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. विरोधी आणि शत्रूंवर विजय मिळवू शकाल. करिअरच्या दृष्टीने हा योग मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप फलदायी असणार आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळणार आहे. प्रमोशनपासून ते नोकरीत बदल होऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. 

वृषभ

हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येणारा आहे. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता येईल. मुलांकडून शुभ बातमी मिळू शकते. तरूणांची लग्ने ठरू शकतात. फॅशन, आर्ट, ज्वेलरी, कपड्यांचा बिझनेस करणाऱ्यांना फायदा होईल. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय लाभदायक असणार आहे. आई-वडिलांच्या सहकार्याने त्रास दूर होतील. पितृक संपत्तीमध्ये वाढ होईल. संपत्ती अथवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. 

धनू

धनू राशीच्या दहाव्या यगरात चार ग्रहांचा शुभ संयोग होणे आणि लक्ष्मी नारायण योग बनणे या राशीसाठी फायदेशीर असणार आहे. करिअरमध्ये वाढ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी मिळेल. चांगली ऑफर मिळण्याची शक्यता. कुटुंबातील प्रभाव वाढेल. आर्थिक त्रास दूर होतील. 

अधिक वाचा - पवार,ठाकरे, नितीश एकाच मंचावर!

मीन 

महालया अमावस्येला ४ ग्रहांचा बनत असलेला शुभ योग मीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय योग्य असणार आहे. या दरम्यान शुभ फल प्राप्ती होईल. दाम्पत्य जीवनात सुधारणा येईल. तसेच संबंध अधिक गाढ होतील. मीडिया आणि राजकारणातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे. काहीतरी चांगले यश मिळवाल. लाईफ पार्टनरसोबत नवा बिझनेस सुरू करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी