Numerology: वयाच्या ३५नंतर या लोकांना मिळते खूप यश, बनतात श्रीमंत

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 14, 2022 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology:अंक ज्योतिषात प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तीची खास पर्सनॅलिटी सांगण्यात आली आहे.या नुसार मूलांक ८च्या व्यक्तीबद्दल अशा काही खास गोष्टी आहेत ज्या वयाच्या पस्तिशीनंतर त्यांना जबरदस्त फायदा मिळतो. 

numerology
वयाच्या ३५नंतर या लोकांना मिळते खूप यश, बनतात श्रीमंत 
थोडं पण कामाचं
  • मूलांक ८च्या व्यक्ती मेहनती, कर्मठ आणि इमानदार असतात. ते आपल्या जीवनात मोठे यश मिळवतात
  • आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात संघर्ष केल्यानंतर ते दुसऱ्या टप्प्यात खूप यश, मोठे पद आणि सन्मान तसेच भरपूर पैसा मिळवतात.
  • हे कितीही गरिबीत जन्मले अथवा विषम परिस्थितीत जरी वाढले असले तरी काही करून यश मिळवतात. 

मुंबई: अंकशास्त्रात अंकांच्या आधारावर व्यक्तीची गणना केली जाते तसेच त्या व्यक्तीचे भविष्य आणि पर्सनॅलिटी सांगितली जाते. यासाठी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते. याला मूलांक असे म्हणतात. जसे कोणत्याही महिन्याच्या ८ , १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असेल. ज्या पद्धतीने प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी असतो त्याचपद्धतीने प्रत्येक मूलांकाचा स्वामी असतो. अंक ज्योतिषात मूलांकचा ८चा स्वामी शनी मानण्यात आला आहे. यामुळेच या राशीवर शनी देवाचा प्रभाव असतो आणि तसेच त्याच्या व्यक्तिमत्वावरही शनी देवाचा प्रभाव असतो. जाणून घेऊया मूलांक ८च्या व्यक्तींची पर्सनॅलिटी आणि भविष्य...This moolank people became rich after 35 year

अधिक वाचा - Video: किळसवाणा प्रकार... गटारीच्या पाण्यात धुतली भाजी!

वयाच्या पस्तिशीनंतर मिळते यश

मूलांक ८च्या व्यक्ती मेहनती, कर्मठ आणि इमानदार असतात. ते आपल्या जीवनात मोठे यश मिळवतात. दरम्यान, यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात संघर्ष केल्यानंतर ते दुसऱ्या टप्प्यात खूप यश, मोठे पद आणि सन्मान तसेच भरपूर पैसा मिळवतात. हे कितीही गरिबीत जन्मले अथवा विषम परिस्थितीत जरी वाढले असले तरी काही करून यश मिळवतात. 

गंभीर तसेच शांततेने करतात काम

मूलांक ८च्या व्यक्ती खूप गंभीर तसेच कोमल हृदयाच्या असतात. हे लोक शांतपणे आपले काम करण्यावर विश्वास ठेवात. यांची काम करण्याचा वेग जरी कमी असला तरी यांच्यात सातत्य असते. हे कमी बोलतात आणि सहजासहजी कोणालाही आपला मित्र बनवत नाहीत. मात्र ज्यांना मित्र बनवतात त्यांची साथ कधीच सोडत नाहीत. 

अधिक वाचा - इमर्जन्सी सिनेमातील कंगनाचा लूक रिव्हील

रहस्यमयी असतात हे लोक

मूलांक ८च्या व्यक्ती खास रहस्यमयी असतात. ते आपल्या मनातली गोष्ट कधीच कोणाला सांगत नाहीत. त्यामुळे कोणाचेही लक्ष खेचून न घेता आपले लक्ष्य गाठत अतात. त्यामुळे जगाला त्यांचे यश दिसते. या व्यक्ती राजकारणात चांगला मुक्काम गाठतात. याशिवाय व्यापारातही चांगले यश मिळवतात. यासाठी लोखंड, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शनसारखी क्षेत्रात काम करण्याने चांगला फायदा होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी