Numerology: लव्ह मॅरेज करतात या तारखेला जन्मलेले लोक, जोडीदारापासून लपवतात ही गोष्ट

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 12, 2022 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology: प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तीची खास गोष्ट असते. ४ मूलांकांच्या व्यक्तीबाबत बोलायचे झाल्यास त्या व्यक्ती प्रेम मिळवण्यात आणि प्रेम देण्यावर विश्वास ठेवतात. 

numerology
Numerology: लव्ह मॅरेज करतात या तारखेला जन्मलेले लोक 
थोडं पण कामाचं
  • मूलांक ४चे लोक स्वभावाने मस्तमजेशीर असतात तसेच खुलेपणाने यांना जगायला आवडते
  • ते खूप हसत खेळत असतात तसेच आसपासच्या लोकाना नेहमी खुश ठेवतात.
  • या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त अफेयर असणे सामान्य बाब आहे.

मुंबई: अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या अंकाच्या आधारावरून गणना केली जाते. जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. अंकशास्त्रात मूलांक १ ते ९ पर्यंत व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरून खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी मूलांकावरून व्यक्तीबाबत बरेच काही जाणून घेता येते. आज आम्ही मूलांक ४ बाबत सांगणार आहोत. जे लोक कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ तारखेला जन्मलेले आहेत त्यांचा मूलांक ४ आहे. This moolank people do love marriage

अधिक वाचा - उद्धव ठाकरेंकडून बांगरांची हकालपट्टी, शिंदेंकडून पुनर्वसन

मस्तमजेशीर असतात मूलांक ४चे लोक 

मूलांक ४चे लोक स्वभावाने मस्तमजेशीर असतात तसेच खुलेपणाने यांना जगायला आवडते. ते खूप हसत खेळत असतात तसेच आसपासच्या लोकाना नेहमी खुश ठेवतात. ते आपल्या पार्टनरलाही खूप खुश ठेवतात. 

असतात अनेक अफेयर्स

या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त अफेयर असणे सामान्य बाब आहे. यांचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक असते की लोक यांच्याकडे आकर्षित असतात. हे लोक दिसण्यासही सुंदर आणि स्मार्ट असतात. यांना लव्ह मॅरेज करणे आवडते. दरम्यान, ते आपल्या पार्टनरवर जरी खूप प्रेम करत असले तरी ते आपल्या मनातली गोष्ट पार्टनरशी शेअर करत नाहीत. खासकरून ते दुख: शेअर करत नाहीत. ते स्वत:च लढाई लढतात. 

आपल्या जोरावर मिळवतात यश

मूलांक ४च्या व्यक्ती खूप टॅलेंटेड असतात तसेच आपल्या जोरावर भरपूर यश मिळवतात. यांच्याकडे खूप पैसा असतो. दरम्यान, अनेक बाबतीत यांना पैसा-संपत्ती वारसाहक्काने मिळते. शानदार जगण्यामुळे अनेकदा पैसा उडवून टाकतात. 

अधिक वाचा - तुम्ही जास्त जगणार की कमी?

बिझनेसमध्ये नाही होत यशस्वी

हे लोक बिझनेसमध्ये यशस्वी होत नाहीत. यांना कोणीही फसवते आणि त्यांचे नुकसान होते. हे लोक थोडे घमेंडी आणि अनेकदा उपद्रवीही ठरतात. या लोकांवर राहूचा प्रभाव असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी