Chaitra Navratri 2022 Dates: यंदा या तारखेपासून होणार चैत्र नवरात्रीची सुरूवात; जाणून घ्या घटस्थापनेची वेळ, मुहूर्त

धर्म-कर्म-भविष्य
Updated Mar 31, 2022 | 12:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chaitra Navratri 2022 | चैत्र महिन्याचा पहिला दिवस हिंदू संस्कृतीनुसार अनेक शुभ मुहूर्तांचा दिवस असतो. चैत्र महिन्याची सुरूवातच चैत्र नवरात्रीच्या (Chaitra Navratri) मंगलमय पर्वाने होत असते. भारतातील विविध भागांत या नवरात्रीला वसंत नवरात्री (Vasant Navratri) म्हणून देखील ओळखले जाते. या काळात निसर्गामध्ये अनेक बदल होत असतात, झाडांना नवीन पालवी येत असते सर्वत्र वसंत ऋतू बहरत असतो.

This year Chaitra Navratri will be held from 2nd April to 11th April
यंदा या तारखेपासून होणार चैत्र नवरात्रीची सुरूवात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चैत्र महिन्याचा पहिला दिवस हिंदू संस्कृतीनुसार शुभ मुहूर्ताचा दिवस असतो.
  • चैत्र महिन्याची सुरूवातच चैत्र नवरात्रीच्या मंगलमय पर्वाने होत असते.
  • यंदा चैत्र नवरात्र २ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान असणार आहे.

Chaitra Navratri 2022 Date: मुंबई : चैत्र महिन्याचा पहिला दिवस हिंदू संस्कृतीनुसार अनेक शुभ मुहूर्तांचा दिवस असतो. चैत्र महिन्याची सुरूवातच चैत्र नवरात्रीच्या (Chaitra Navratri) मंगलमय पर्वाने होत असते. भारतातील विविध भागांत या नवरात्रीला वसंत नवरात्री (Vasant Navratri) म्हणून देखील ओळखले जाते. या काळात निसर्गामध्ये अनेक बदल होत असतात, झाडांना नवीन पालवी येत असते सर्वत्र वसंत ऋतू बहरत असतो. लक्षणीय बाब म्हणजे मराठी नववर्षाची सुरूवात म्हणून या दिवशी गुढीपाडवा (Gudi Padwa) देखील साजरा केला जातो. पाडव्याच्या दिवशीच अनेक मंडळी आपल्या जीवनातील नवीन गोष्टींचा आरंभ करण्यास सुरूवात करत असतात. यंदा हा सण शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. मात्र यंदा चैत्र नवरात्री कधी सुरू होणार याबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम आहे. (This year Chaitra Navratri will be held from 2nd April to 11th April). 

अधिक वाचा : दाऊद इब्राहिम होता ऋषी कपूर यांच्या शूजचा फॅन

दरम्यान, शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्येही दुर्गा मातेची नऊ रूपे पूजण्याची परंपरा आहे. वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी आणि आनंद कायम राहावा म्हणून दुर्गा मातेचे पूजन करण्याची पद्धत आहे. यंदा चैत्र नवरात्र २ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान असणार आहे. यामध्ये अष्टमी ९ एप्रिल दिवशी अष्टमी साजरी केली जाणार आहे. 

घटस्थापनेचा वेळ आणि मुहूर्त (Ghatasthapana Muhurat) 

चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त शनिवार, २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६.२२ ते ८.३१ पर्यंत असेल. या शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी ०२ तास आणि ०९ मिनिटे असेल. याशिवाय घटस्थापनेवरील अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटे एवढा असेल. 

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे काही जण घटस्थापना करतात. तर काही महिला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे देखील कार्यक्रम करतात. या दिवशी घरात शुभ वातावरण असते सर्वत्र स्वच्छ केले जाते. चैत्र नवरात्रीमध्ये देखील पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हाचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिध्दीदात्री इत्यादी देवीच्या रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी