Numerology Number 5 Horoscope 2022 | वर्षाच्या सुरूवातीला येतील थोड्या अडचणी, ५ क्रमांकासाठी हिंमत महत्त्वाची

Numerology Number 5 : ज्यांचा जन्म कोणत्याही वर्षी, कोणत्याही महिन्यात ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे ते सर्व जन्मांक ५ च्या प्रभाव क्षेत्रात येतात. ५ या क्रमांकाचा स्वामी बुध असतो. या जन्मांकाच्या व्यक्ती प्रशासकीय किंवा व्यवस्थापन सेवेत, क्षेत्रात मोठ्या पदांवर पोचतात. ते उच्च पदस्य प्रशासक होतात. त्यांना राजकारणात यश मिळते, मोठी पदे मिळतात.

Numerology Number 5 Horoscope 2022
५ जन्मांकासाठी २०२२चे भविष्य 
थोडं पण कामाचं
  • ५ जन्मांकाच्या लोकांचे विवाहाचे मार्ग मोकळे होतील. संसारी जीवन सुखकारक होईल
  • या जन्मांकाच्या व्यक्ती प्रशासकीय किंवा व्यवस्थापन सेवेत, क्षेत्रात मोठ्या पदांवर
  • अनेक वर्षांनंतर आरोग्याचे सुख मिळेल, यावर्षी आर्थिक प्रगती होईल.

Numerology Number 5 Horoscope 2022 (अंक ज्योतिष राशीफळ २०२२) : ज्यांचा जन्म कोणत्याही वर्षी, कोणत्याही महिन्यात ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे ते सर्व जन्मांक ५ च्या प्रभाव क्षेत्रात येतात. ५ या क्रमांकाचा स्वामी बुध असतो. या जन्मांकाच्या व्यक्ती प्रशासकीय किंवा व्यवस्थापन सेवेत, क्षेत्रात मोठ्या पदांवर पोचतात. ते उच्च पदस्य प्रशासक होतात. त्यांना राजकारणात यश मिळते, मोठी पदे मिळतात. याचबरोबर न्यायपालिकांमध्ये मोठे यश मिळते. शुक्र आणि शनी याचे मित्र ग्रह आहेत. बुध हा वाणीचा म्हणजे संवादाचा ग्रह आहे. त्यामुळे ५ जन्मांकाचे लोक जबरदस्त वक्ते असतात. या वर्षाचा क्रमांक ६ आहे. (Horoscope 2022: this year initially may face some problems, Patience is important for number 5)

५ या जन्मांकाचे वार्षिक अंकफळ-

१. आरोग्य

या वर्षी मार्चनंतर आरोग्य उत्तम राहील. अनेक वर्षांनंतर आरोग्याचे सुख मिळेल, आरोग्यात सुधारणा होईल. फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये आरोग्याच्या काही समस्यांची शक्यता असेल.

२. नोकरी आणि व्यवसाय

यावर्षी तुम्ही नोकरी आणि व्यवसायात प्रगती कराल. मार्च ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान परदेशात जाण्याची संधी मिळेल. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पदोन्नती किंवा नोकरी बदलून चांगली संधी मिळेल. बॅंकिंग, मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना मोठा लाभ होईल.

३. लव लाइफ आणि वैवाहिक जीवन

यावर्षी १५ मार्चनंतर तरुणांना प्रेमात यश मिळेल. विवाहाचे मार्ग मोकळे होतील. संसारी जीवन सुखकारक होईल. जानेवारी आणि एप्रिल या कालावधीत विवाहाचे योग जुळून येऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भात सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सावध राहावे लागेल.

४. आर्थिक स्थिती

यावर्षी आर्थिक प्रगती होईल. १५ जानेवारीला मकर संक्रांतीनंतर आर्थिक यश, धनप्राप्ति यांच्या संधी येतील. जमीन किंवा घराचे व्यवहार होतील. वाहनदेखील खरेदी कराल. यावर्षी सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने विकत घ्याल. चांगल्या कामात पैसा खर्च होईल.

५. शुभ समय

१५ फेब्रुवारी ते १५ जुलैपर्यतचा काळ चांगला असणार आहे. ऑक्टोबर महिनादेखील चांगला असेल. यावर्षी मे महिन्यानंतरचा काळ आर्थिकदृष्टीने खूपच चांगला असेल.

६. समस्यांवरील उपाय

दररोज श्री सूक्त आणि विष्णूसहस्त्रनामाचे पठन करावे. प्रत्येक बुधवारी श्री गणेशाची दूर्वा अर्पण करून पूजा करावी. प्रत्येक बुधवारी गाईला पालक किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. मूंगाचे दान करा. गरीबांना हिरवे वस्त्र दान करा.

अंक ज्योतिषामध्ये(numerology) अकांच्या आधारावर भविष्यवाणी केली जाते. यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेतले जाते. अंक ज्योतिषानुसार(numerology) प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि या कारणामुळे प्रत्येकाचे महत्त्व असते. अंक ज्योतिषाच्या माध्यमातून नवीन वर्ष कसे जाणार आहे हे जाणून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी