Zodiac Sign: जुलैमध्ये या ३ राशीच्या व्यक्तींचा वाढणार जबरदस्त बँक बॅलन्स, कुबेराची होणार कृपा

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 15, 2022 | 20:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

July Horoscope 2022: जुलै महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. १६ जुलैला सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ आणि शुक्रही या महिन्यात आपली राशी बदलतील. 

zodiac sign
जुलैमध्ये या ३ राशीच्या व्यक्तींचा वाढणार जबरदस्त बँक बॅलन्स 
थोडं पण कामाचं
  • जुलैमध्ये अनेक मोठे ग्रह जसे सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह राशी परिवर्तन करत आहेत.
  • ६८ दिवसांनी २ जुलैला बुध राशी परिवर्तन करत मिथुन राशीत प्रवेश करत आहे.
  • १६ जुलैला सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल. इतकंच नव्हे तर मंगल आणि शुक्र राशी परिवर्तनही याच महिन्यात करत आहेत.

मुंबई: प्रत्येक नवीन महिना लोकांसाठी एक नवी आस, नवी आशा घेऊन येत असतो. अशातच जुलै महिन्याबाबतही(july month) लोकांच्या अपेक्षा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की येणारा काळ त्या व्यक्तीसाठी लाभदायक ठरणारा असवा. शुभ फळ घेऊन येणारा असावा. मात्र हे सर्व ग्रहांच्या चालीवर अवलंबून असते. जुलै महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन(transist) करत आहेत याचा शुभ आणि अशुभ परिणाम राशींवर पाहायला मिळणार आहे. This zodiac sign people will get more bank balance in july month

अधिक वाचा - पंढरपूर यात्रेसाठी ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार

जुलैमध्ये अनेक मोठे ग्रह जसे सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. ६८ दिवसांनी २ जुलैला बुध राशी परिवर्तन करत मिथुन राशीत प्रवेश करत आहे. तर १६ जुलैला सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल. इतकंच नव्हे तर मंगल आणि शुक्र राशी परिवर्तनही याच महिन्यात करत आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे. 

सिंह रास

ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशींच्या लोकांसाठी काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. पदोन्नतीचे खूप संकेत आहेत. यादरम्यान थांबलेली कार्ये पूर्ण होतील. ग्रहांचे राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. ाया दरम्यान ऑफिसमध्ये चांगले काम कराल. चांगल्या नोकरीची ऑफर येऊ शकते. परदेशात जॉब शोधणाऱ्यांना यश मिळेल. 

धनू रास 

या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या या महिना लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत धनदेवता कुबेराची खूप कृपा राहील. तसेच धन आगमनाचे नवीन रस्ते खुले होतील. जमीनीसंबंधीत प्रकरणात लाभ होण्याची शक्यता आहे. जर गुंतवणुकीचा विचार करताय तर वेळ अनुकूल आहे. या दरम्यान बचत करण्यातही यश मिळेल. 

अधिक वाचा - ICC T20 रॅंकिंगच्या टॉप-10 मध्ये ईशान किशनची झेप

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना शुभ फळ देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. या दरम्यान एखादी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते. व्यापार वाढवण्याचा विचार करतायत तर वेळ अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी