Hartalika 2022: आज हरितालिका, 'या' शुभ मुहूर्तावर करा शिव-पार्वतीची पूजा; मिळेल अधिक फळ

Hartalika Shubh Yog and Muhurat:विवाहित महिला आणि तरूणीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी महिला आणि तरूणी निर्जळ उपवास (Fast without water) करतात. यंदा हरितालिका व्रत हस्त आणि चित्रा नक्षत्रात ठेवण्यात येणार आहे.

Hartalika 2022
हरितालिका व्रत 
थोडं पण कामाचं
  • आज हरितालिका (Hartalika) आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या (Shukla Paksha) तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत पाळले जाते.
  • हरितालिका व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
  • हरितालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश देवी पार्वती (Goddess Parvati) आणि भगवान शिव (Lord Shiva) यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो.

नवी दिल्ली: Hartalika 2022: आज हरितालिका (Hartalika)  आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या  (Shukla Paksha) तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत पाळले जाते. हरितालिका व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हरितालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश देवी पार्वती (Goddess Parvati) आणि भगवान शिव (Lord Shiva) यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो. विवाहित महिला आणि तरूणीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी महिला आणि तरूणी निर्जळ उपवास (Fast without water)  करतात. यंदा हरितालिका व्रत हस्त आणि चित्रा नक्षत्रात ठेवण्यात येणार आहे.   हरितालिकाचा उपवास भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर दुसरीकडे अविवाहित मुलीही चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात. (Today Hartalika 2022 worshiping in this auspicious time Shubh Yog and Muhurat in marathi)

हरितालिका  व्रताचे 2 शुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार या हरितालिका व्रतादिवशी एक दुर्मिळ आणि अतिशय शुभ संयोग घडत आहे. या दिवशी सौम्य योग असून हस्त आणि चित्रा नक्षत्र असतील. हरितालिका व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माँ पार्वतीची सौम्य योगाने पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

अधिक वाचा-  मुंबईकरांनो, आता नो टेन्शन..! पाण्याची चिंता मिटली; सातही धरणात 97% साठा

हरितालिका पूजा शुभ मुहूर्त

आज हरितालिकेची पूजा करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:20 ते 08:59 पर्यंत असेल. या योगात केलेले शुभ कार्य आणि उपासना अनेक पटींनी अधिक शुभ फल देईल. या दिवशी स्त्रिया सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून हिरवी किंवा लाल वस्त्रे परिधान करतात. 

देवासमोर व्रताचा संकल्प करावा आणि दिवसभर काहीही न खाता, न पिता राहावं त्यानंतर संध्याकाळी नवीन वस्त्रे परिधान करून श्रृंगार करून विधिनुसार शिव-पार्वतीची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. शक्य नसल्यास रात्री पूजा करून पाणी प्यावे.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी