आजचे राशीभविष्य, २३ जून २०२१ : असे असेल बुधवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, 23 जून 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

today horoscope bhavishya in marathi rashi bhavishya 23 june 2021 Wednesday
आजचे राशीभविष्य, २३ जून २०२१ 

थोडं पण कामाचं

  • वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: खर्चावर नियंत्रण ठेवा.
  • तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील.
  • मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल.

Daily Horoscope राशी भविष्य 23 June 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily Horoscope 23 June 2021 rashifal in Marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: घरात लवकरच मंगल कार्ये होतील. दिवसभर धनप्राप्तीचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. महागड्या वस्तू जपून वापरा. शुभ रंग - तांबडा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रसंगात थोडा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. धन प्राप्ती होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारांमध्ये बढती होईल. व्यापार उत्तम राहील. शुभ रंग - आकाशी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मिळणाऱ्या यशामुळे मन प्रसन्न असेल. लव्ह लाईफमधील अडथळे दूर होतील. दाम्पत्य जीवनात आनंदी आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगलं राहील. धनलाभ होईल. शुभ रंग - राखाडी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: अनेक योजना तुमच्या डोक्याला त्रासदायक ठरतील. प्रेमप्रकरणात काही तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे. प्रगतीच्या आड येणाऱ्या बाधा नष्ट होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पोपटी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. शुभ रंग - पिवळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत यश प्राप्त होईल. मुलांना यश प्राप्त होईल. बँकिंग, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल. धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात यश आणि प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य चांगलं राहील. शुभ रंग - हिरवा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: वाद-विवाद टाळा. भावूक होऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमधील कामात यश प्राप्त होईल. शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी