राशीभविष्य : शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 06, 2021 | 01:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Daily Horoscope राशी भविष्य, 6 ऑगस्ट 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

horoscope
राशीभविष्य : शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१ 

थोडं पण कामाचं

  • राशीभविष्य : शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 6 August 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत यश प्राप्त होईल. मुलांना यश प्राप्त होईल. बँकिंग, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा. 
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. आजचा शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. आजचा शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल. आज धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात यश आणि प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज वाद-विवाद टाळा. भावूक होऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमधील कामात यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य  / Scorpio Horoscope Today: घरात लवकरच मंगल कार्ये होतील. आज दिवसभर धनप्राप्तीचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. महागड्या वस्तू जपून वापरा. आजचा शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रसंगात थोडा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. धन प्राप्ती होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारांमध्ये बढती होईल. व्यापार उत्तम राहील. आजचा शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मिळणाऱ्या यशामुळे मन प्रसन्न असेल. लव्ह लाईफमधील अडथळे दूर होतील. दाम्पत्य जीवनात आनंदी आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: अनेक योजना तुमच्या डोक्याला त्रासदायक ठरतील. प्रेमप्रकरणात काही तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे. प्रगतीच्या आड येणाऱ्या बाधा नष्ट होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी