Vastu Tips For Good Health: शास्त्रामध्ये उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे धन असल्याचे सांगितले आहे. तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्हाला हवे ते सर्व काही मिळू शकते परंतु तुमचे आरोग्य चांगले नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी-कधी घरातील वास्तुदोष हे या सर्वांचे कारण असते. घरातील कोणत्या ना कोणत्या सदस्याचे आजारपण किंवा कुटुंबात भांडणे, ही वास्तुदोषाची लक्षणे आहेत. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा प्रयत्न केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि कौटुंबिक वातावरणही आनंदी राहते. चला जाणून घेऊया वास्तुच्या या उपायांबद्दल. (Try these Vastu Remedies, everyone in family will stay healthy)
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुटला असेल किंवा त्यात काही दोष असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा, हे अत्यंत आवश्यक मानले जाते. वास्तूनुसार याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि घरात भांडणं कायम राहतात. त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा.
अधिक वाचा: Money Remedies: कितीही कमाई केली तरी हातात पैसा टिकत नाही? नारळाचा करा हा उपाय; व्हाल मालामाल
जड वजनाच्या वस्तू किंवा फर्निचर कधीही घराच्या मध्यभागी ठेवू नयेत. वास्तूमध्ये हे स्थान ब्रह्म स्थान मानले जाते, ही जागा नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवावी. या ठिकाणी जड वस्तू ठेवणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य मानले जात नाही. याचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच ती काढून टाकणे योग्य मानले जाते. यासोबतच घरातील देवतेची मूर्ती नेहमी दक्षिण दिशेला असावी हेही ध्यानात ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा अतिशय शुभ मानला जातो कारण त्यात देवाचा वास असल्याचे मानले जाते. जर तुमच्या घराचे मंदिर या दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते. या दिशेला मंदिर असल्याने तुम्हाला निरोगी शरीर तर मिळेलच शिवाय घरात सुख-समृद्धीही नांदेल. योग्य ठिकाणी मंदिर असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि देवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते.
घरात तुटलेली काच, बंद घड्याळ, तुटलेली वस्तू, रद्दी इत्यादी कधीही ठेवू नये, याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आर्थिक बाबींवरही विपरीत परिणाम होतो. तसेच घरात कोणत्याही नको असलेल्या गोष्टी असू नयेत. संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळावा, ज्यामुळे घरात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते आणि शरीर निरोगी होते.
अधिक वाचा: Horoscope 16 April 2023: मेष आणि मिथुन राशीसह या राशींचे भाग्य चमकेल, जाणून घ्या रविवारचं राशीभविष्य
वास्तुशास्त्रानुसार, घर किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल बॉल ठेवणे शुभ मानले जाते आणि व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. क्रिस्टल बॉल नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि तुमचे घर आणि कार्यालय अशुभ वारावरणाासून दूर ठेवते. तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर देखील क्रिस्टल बॉल ठेवू शकता.