Daily Horoscope : राशीभविष्य : मंगळवार, १९ जुलै२०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

Daily Horoscope
राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • Daily Horoscope : राशीभविष्य : मंगळवार, १९ जुलै २०२२
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
 • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya: Tuesday, 19 July 2022 daily Horoscope: आजचे राशी भविष्य सोमवार, १९ जुलै २०२२: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today:  व्यवसाय स्थिर राहिल. उगाच वाद घालत बसू नका. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य लाभेल. शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: मित्रांच्या मदतीने आणि सहकार्याने महत्त्वाचे कामे मार्गी लागतील. दिवसभर थोडा ताण राहिल. धोका पत्करण्याची वेळ येईल. शुभ रंग - पांढरा. 
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: ठरवलेली कामे वेळेत होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात योग्य निर्णय घ्या. शुभ रंग - लाल.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: जुने मित्र भेटतील आणि दिवस चांगला जाईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. आयुष्यात सुख समृद्धि वाढेल. शुभ रंग - पोपटी.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज जास्त धावपळ होईल. थांबलेले व्यवहार पूर्ण होतील. शुभ रंग - आकाशी.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्य चांगले राहिल आणि सुधरेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ रंग - पिवळा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: खूप पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. घरासंबंधी केलेली दगदग कामी येईल. शुभ रंग - तपकिरी.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today:  नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. कामानिमित्ताने बाहेर पडावे लागेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. शुभ रंग - हिरवा.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आज मन प्रसन्न राहिल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचे नियोजन होईल. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग - निळा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today:  केलेल्या कामामुळे घरात आणि समाजात टीका होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता. व्यापार्‍यात स्थैर्य प्राप्त होईल. शुभ रंग - तांबडा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: राजकीय सहकार्य वाढेल. अध्यात्म आणि धर्मकार्यात मन लागेल. राजकीय सहकार्य लाभेल. शुभ रंग - नारंगी.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today:  नव्या योजना ठरतील. मनापासून मेहनत केल्यास नक्की यश मिळेल. आळस टाळा. शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी