Tulsi Vivah 2022: कधी आहे तुळशी विवाह? जाणून घ्या, तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Tulsi Vivaah 2022 Date And Time: हिंदू पंचांगानुसार, तुलसी विवाह कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला आयोजित केला जातो. यंदा तुळशी विवाह 5 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. द्वादशी तिथी 5 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 06:08 पासून सुरू होत आहे. त्याच वेळी, तो 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:6 वाजता संपेल.

tulsi vivaah 2022  when is tulsi marriage know date auspicious time and importance
कधी आहे तुळशी विवाह? जाणून घ्या, तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • यंदा तुळशी विवाह 5 नोव्हेंबर 2022 रोजी
  • या दिवसापासून सुरू होतात सर्व शुभ कार्य
  • तुळशी विवाहाला देवशयनी एकादशी आणि हरि प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात

Tulsi Vivaah 2022 Date: हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. याला देवशयनी एकादशी आणि हरि प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. यंदा तुळशी विवाह 05 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू हे चार महिन्यानंतर योग निद्रेतून (Tulsi Vivaah 2022) चार महिन्यानंतर जागृत होतात. (tulsi vivaah 2022  when is tulsi marriage know date auspicious time and importance)

शास्त्रानुसार देवशयनी एकादशीपासून चातुर्मास संपल्यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. पुराणात सांगितलेल्या आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शाळीग्रामचा विवाह माता तुळशीशी होतो. शाळीग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते.

अधिक वाचा: मंगलमुर्ती गणराया होते शापित; तुळशी मातेच्या शापेमुळे गणपती बाप्पा अडकले दोन संसारात

असे मानले जाते की, या दिवशी माता तुळशी आणि भगवान शाळीग्रामची पूजा केल्याने विवाहित महिलांचं पुत्र सौख्यासंबंधित सर्व समस्या दूर होतात. भगवान शाळीग्राम आणि माता तुळशी यांचा आध्यात्मिक विवाह देखील याच दिवशी होतो (Tulsi Vivaah 2022 Date) शास्त्रानुसार देवशयनी एकादशी ही सर्व एकादशी तिथींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. अशा परिस्थितीत या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया तुलसी विवाह 2022 नेमकं कधी आहे? तसेच त्याचा शुभ काळ आणि महत्त्वही जाणून घेऊयात.

तुळशी विवाह 2022 तारीख, शुभ मुहूर्त, पूजा वेळ (Tulsi Vivaah 2022 Date, Shubh Muhurat, Puja Timing)

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. यावेळी तुळशी विवाह 5 नोव्हेंबर 2022, शनिवारी आहे. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होत आहे. तर 06 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:06 वाजता ही तिथी संपेल. तुळशी विवाहाची पारण वेळ ही दुपारी 1.09 ते 03.18 पर्यंत आहे.

अधिक वाचा: Ganesh Chaturthi 2022 : म्हणून गणपतीची झाली दोन लग्न, वाचा गणेश विवाहाची ही पौराणिक कथा

तुळशी विवाहाचे महत्व

तुळशी विवाहानंतर लग्न, गृहप्रवेश, मुंज इत्यादी सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा केल्याने माणसाला सुख-समृद्धी मिळते आणि संसारातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर वैकुंठ लोकाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान शाळीग्रामचा विवाह माता तुळशीशी होतो. भगवान शाळीग्राम श्री  हे भगवान विष्णूचे रूप असून माता तुळशीला धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते.

अधिक वाचा: Basant Panchami : वसंत पंचमीच्या दिवशी श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेचा दिमाखदार विवाह सोहळा   

संतती प्राप्तीसाठीही हे व्रत विशेष मानले जाते. यासाठी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सहस्रनाम मंत्राचा 108 वेळा जप करून भगवद्गीतेचे पठण करावे. त्याच वेळी, संध्याकाळी, माता तुळशीला वधूच्या रूपात सजवा आणि तिची विधिवत पूजा करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी