Rashi: पुढचे 140 दिवस 'या' चार राशींसाठी ठरणार फायद्याचे, ग्रहांची असेल विशेष कृपा

Rashi Parivartan: या 4 राशीच्या लोकांसाठी पुढील 140 दिवस खूप खास असणार आहेत. या दरम्यान मंगळ, बुध आणि गुरू हे ग्रह राशी बदलणार आहेत. ज्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे.

Rashi Parivartan
'या' चार राशींसाठी पुढचे 140 दिवस सुखाचा काळ, होईल कल्याण 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संस्कृतीत एक वेगळं स्थान आहे. ज्योतिषशास्त्रावर अनेक जण विश्वास ठेवतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याला खूप महत्त्व आहे.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलत राहतात. त्यांच्या राशी बदलामुळे (Rashi Parivartan 2022) काही राशी विभक्त होतात.
  • येत्या 140 दिवसांत मंगळ (Mars), बुध (Mercury)आणि गुरूच्या (Jupiter)राशीत बदल होणार आहे.

नवी दिल्ली: Rashi Parivartan 2022: ज्योतिषशास्त्राला(Astrology) भारतीय संस्कृतीत एक वेगळं स्थान आहे. ज्योतिषशास्त्रावर अनेक जण विश्वास ठेवतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलत राहतात. त्यांच्या राशी बदलामुळे (Rashi Parivartan 2022) काही राशी विभक्त होतात आणि अनेक राशींना नुकसानही सहन करावे लागते. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. दरम्यान येत्या 140 दिवसांत मंगळ (Mars), बुध (Mercury)आणि गुरूच्या (Jupiter)राशीत बदल होणार आहे. त्यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. 

चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

अधिक वाचा- Maharashtra Monsoon Session : शिंदे सरकारचं आज पहिलं अधिवेशन, सत्ताधारी आणि विरोधक खडाजंगी होणार

तूळ: (Libra)

या राशीच्या लोकांसाठी पुढील 140 दिवस खूप शुभ असणार आहेत. त्यांना वैवाहिक जीवनात आनंद मिळेल आणि कुटुंबात शांतीचे वातावरण राहणार आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल राहील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचा हा शोध लवकरच पूर्ण होणार आहे. या दरम्यान, कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार राहणार आहे. तुम्हाला कुटुंबासह आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मीन  (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान सारखा असेल. ते जे काही काम सुरू करतात, त्यांना यश मिळेल. त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. कुटुंबाची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल आणि अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची देखील शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांना पुढील 140 दिवसांमध्ये नोकरी-व्यवसायात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. त्यांना उत्तम आरोग्याचे अनेक फायदे मिळतील. जुन्या मित्रांना अचानक भेटण्याची किंवा बालपणीच्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.  पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध खूप चांगले राहतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि आर्थिक लाभाचे योग निर्माण होतील.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळेल. त्यांची क्षमता आणि कार्यकुशलता शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये वाढेल. ते कोणत्याही क्षेत्रात काम करतील. तेथे तुमची स्तुती होईल. नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्यासाठी त्यांना भरपूर संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी त्यांचे संबंध चांगले राहतील. पत्नीसह वैवाहिक जीवन आनंदी राहील.

अधिक वाचा-  Weight Loss: Belly Fat कमी करण्यासाठी खास पाच सोप्या Tips, सहज कमी होईल पोटावरील चरबी

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी