Tulsi for Prosperity: लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा तुळशीशी संबंधित हे सोपे उपाय...होईल धनप्राप्ती

Tulsi : आपल्याकडे तर तुळशीची वनस्पती अत्यंत भाग्यवान मानली जाते. म्हणूनच जवळपास सर्वच घरांच्या समोर किंवा अंगणात किमान एक तुळशीचे (Tulsi)रोप नक्कीच असते. तुळशीमध्ये लक्ष्मीचा निवास असतो अशी मान्यता आहे. तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचीही कृपा राहते असे मानतात. तुळशीची पूजा आणि इतर उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात. घराची प्रगती होते. खासकरून आर्थिक समस्या दूर होतात. इतर अनेक समस्यांपासून, दोषांपासून मुक्ती होते असे मानले जाते.

Tulsi Upay
तुळशीचे खास उपाय 
थोडं पण कामाचं
  • तुळशीची पूजा घराघरात केली जाते
  • तुळशीची पूजा आणि इतर उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात अशी मान्यता
  • आर्थिक समस्यांच्या बाबतीत ज्योतिष शास्त्रातदेखील तुळशीशी संबंधित उपाय

Use of Tulsi for Prosperity:नवी दिल्ली: भारतीय परंपरेत तुळस ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. पूजेसाठी आणि औषधी गुणधर्मासाठी तुळशीचे महत्त्व (Importance of Tulsi) मोठे आहे. आपल्याकडे तर तुळशीची वनस्पती अत्यंत भाग्यवान मानली जाते. म्हणूनच जवळपास सर्वच घरांच्या समोर किंवा अंगणात किमान एक तुळशीचे (Tulsi)रोप नक्कीच असते. तुळशीमध्ये लक्ष्मीचा निवास असतो अशी मान्यता आहे. तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचीही कृपा राहते असे मानतात. तुळशीची पूजा रोज करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तुळशीची पूजा आणि इतर उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात. घराची प्रगती होते. खासकरून आर्थिक समस्या दूर होतात. इतर अनेक समस्यांपासून, दोषांपासून मुक्ती होते असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रातदेखील तुळशीशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यामुळे कुटुंबाला खास फायदा होतो असे मानतात. यासंदर्भात अधिक जाणून घेऊया- (Use of Tulsi puja in getting prosperity and financial growth)

अधिक वाचा : आपलं काय चुकतयं, हे कळायलं लागलयं : बाळासाहेब थोरात

तुळशीशी संबंधित उपाय  (Tulsi Remedies in Marathi)

तुळशीबाबत अशी मान्यता आहे की भगवान शंकराला तुळशीमंजरी अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे भक्तांच्या समस्या दूर होतात. त्यांना धनप्राप्ती होते आणि आर्थिक प्रगती होते. लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तुळशीची पूजा केली जाते.

त्याचबरोबर भगवान विष्णूलादेखील तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच विष्णूला अन्न अर्पण करताना तुळशीच्या पानाचा वापर केला जातो, असेही सांगण्यात आले आहे.  तुळशीमंजिरी विष्णूला अर्पण केल्याने अज्ञानातून झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. 

अधिक वाचा :  Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

गंगाजलासंदर्भातदेखील तुळशीच्या पानांचे विधी सांगितले आहेत. गंगाजलात तुळशीची पाने किंवा तुळशीच्या मंजिरी मिसळून दररोज घरात पाणी शिंपडल्यास घरातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात अशीही एक मान्यता आहे. या उपायामुळे आर्थिक नुकसान थांबते. अर्थात हे करताना तुळशीची पाने पायाखाली येऊ नये याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. 

अधिक वाचा : या दोन क्रिकेटर भावांनी भारताला जिंकून दिलाय वर्ल्डकप, गरिबीतून आले वर

4. खायच्या सवयी

लक्ष्मीच्या पूजेसंदर्भातदेखील तुळशीचा वापर सांगितला आहे. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्याने भक्तांना त्याचा खास लाभ मिळतो, असेही सांगण्यात आले आहे. यामुळे घरातील व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात असेही मानले जाते. तुळशीचे अनेक अंगांनी आपल्याकडे महत्त्व आहे. त्यामुळेच प्रत्येक घरात तुळशीला एक खास स्थान असते.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी