Feng Shui Tips: फेंगशुई मांजरीचे आहेत अनेक फायदे, धनप्राप्तीसाठी घरात ठेवा या रंगाची मांजर

चायनीज वास्तू शास्त्र फेंगशुई नावाने ओळखले जाते. फेंगशुई पद्द्धतीत आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यावर प्राधान्य दिले गेले आहे. फेंगशुई ही जरी चायनीज पद्धत असली तरी भारतात ती तितकीच लोकप्रिय आहे. भारतीय बाजारात फेंगशुईसंबंधित अनेक शोभेच्या वस्तू मिळतात. जर या वस्तू फेंगशुई नियमानुसार घरात ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

feng shui cats
फेंगशुई मांजर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चायनीज वास्तू शास्त्र फेंगशुई नावाने ओळखले जाते.
  • फेंगशुई पद्द्धतीत आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यावर प्राधान्य दिले गेले आहे.
  • फेंगशुई ही जरी चायनीज पद्धत असली तरी भारतात ती तितकीच लोकप्रिय आहे.

Feng Shui Cat Direction:  चायनीज (Chinese) वास्तू शास्त्र (vastu shastra) फेंगशुई (Feng Shui) नावाने ओळखले जाते. फेंगशुई पद्द्धतीत आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा (positive energe) आणण्यावर प्राधान्य दिले गेले आहे. फेंगशुई ही जरी चायनीज पद्धत असली तरी भारतात (india) ती तितकीच लोकप्रिय आहे. भारतीय बाजारात फेंगशुईसंबंधित अनेक शोभेच्या वस्तू मिळतात. जर या वस्तू फेंगशुई नियमानुसार घरात ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच धनलाभ होतो आणि व्यक्तीचे दुर्गुण जाऊन चांगले गुण येतात. जाणून घेऊया बाजारात फेंगशुईच्या कुठल्या वस्तू मिळतात आणि त्यांचे नियम काय आहेत.

अधिक वाचा : Vastu Tips: तूप आणि तेलाच्या दिव्याचे आहेत वेगवेगळे नियम

फेंगशुई मांजर

सोनेरी मांजर

चायनीज वास्तूशास्त्र फेंगशुईत मांजरीला शुभ मानले जाते. फेंगशुई मांजरींचा रंग वेग वेगळा असतो. प्रत्येक मांजरीचा प्रभाव वेगळा असतो. जर तुमच्यावर आर्थिक संकट आले असेल तर घरात सोनेरी रंगाची मांजर ठेवा. त्यामुळे आर्थिक संकटं दूर होतात आणि धनलाभ होतो.

अधिक वाचा : Vastu Tips: चपाती वाढताना चुकूनही करू नका या चुका,नाहीतर पडेल भारी

हिरवी आणि लाल मांजर

सौभाग्य प्राप्तिसाठी हिरव्या रंगाची मांजर घरात इशान्येकडे ठेवावी. तसेच आयुष्यातील संकटं दूर करण्यासाठी लाल रंगाची मांजर दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावी.

अधिक वाचा : Vastu Tips For Home: घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका 'या' गोष्टी, करावा लागेल आर्थिक संकटाचा सामना

फेंगशुई उंट

चायनीज वास्तूशास्त्र फेंगशुईत उंटाला संघर्षाचे प्रतीक मानले गेले आहे. घरात फेंगशुई उंट ठेवल्यास कुटुंबावरील आर्थिक संकटं दूर होतात. तसेच उंटाची जोडी ठेवल्यामुळे घरात धन येतं. हा उंट घर किंवा ऑफिसात उत्तर पश्चिम दिशेला ठेवायचा असतो.

अधिक वाचा : Vastu Shastra Tips: काच फुटल्यावर मिळतात अनेक गोष्टींचे संकेत, जाणून घ्या ते शुभ की अशुभ

फेंगशुई धातुचा कासव

फेंगशुई धातूपासून बनलेला कासव घरात ठेवणे शुभ मानले जाते. धातूचा किंवा तांब्याचा कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवावा. उत्तर दिशा लक्ष्मी मातेची दिशा मानली जाते. या दिशेला कासव ठेवल्यास उत्पन्नाचे किंवा संपत्तीचे मार्ग खुलतात. तसेच व्यापारातही यश मिळतं.  

क्रिस्टल कासव

घरात जर वाद होत असतील क्रिस्टल कासव घरात ठेवावा. या कासवाचे तोंड घरासमोर असायला हवा. हा कासव पाण्याच्या वाटीत ठेवल्यास घरात समृद्धी येते.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी