Oil For Diwali Diyas:दिवाळीसाठीच्या दिव्यांमध्ये वापरा हे तेल, होतील अनेक लाभ

धर्म-कर्म-भविष्य
Updated Nov 04, 2021 | 11:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Diwali diyas: आज म्हणजेच ४ नोव्हेंबरला संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की यानिमित्त कोणत्या तेलाने पणत्या पेटवलेल्या शुभ असतात. 

diwali diyas
दिवाळीसाठीच्या दिव्यांमध्ये वापरा हे तेल, होतील अनेक लाभ 
थोडं पण कामाचं
  • यावर्षी दिवाळी आज म्हणजेच ४ नोव्हंबरला साजरी केली जात आहे.
  • दिवाळी म्हणजे दिव्यांचा, रोषणाईचा सण
  • जाणून घ्या दिवाळीत दिव्यांसाठी कोणते तेल वापरावे

मुंबई: दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. याच्या तयारी खूप आधीपासून केलेली असते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या तिथीला हा सण साजरा केला जातो. दिवाळीमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात. लक्ष्मी मातेचे स्वागत केले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का दिवे पेटवण्यासाठी वापरेल जाणारे तेलही खूप महत्त्वाचे असते. 

दिवाळीच्या वेळेस दिवे पेटवल्याने घरात सकारात्मक उर्जा वाढते. तसेच घरात शांतता आणि समृद्धी राहते. अशातच यावर लक्ष देणेही गरजेचे आहे की आप दिवे पेटवण्यासाठी कोणत्या प्रकारचे दिवे वापरतो. जाणून घ्या या कोणत्या ५ तेलांचा वापर दिव्यामध्ये करता येऊ शकतो. 

शुद्ध तूप

गायीच्या तुपाला सगळ्यात शुद्ध मानले जाते. गायीच्या तुपाने दिवे लावल्याल आजूबाजूच्या वातावरणातही सकारात्मक उर्जा निर्माण होते. असं म्हटलं जात की दिवाळीच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने दारिद्रय दूर होते. तसेच घरात सुख-समृद्धी राहते. यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते. 

तिळाच्या तेलाचा वापर

तिळाच्या तेलाचा वापर करून दिवे लावणेही शुभ मानले जाते. याचा वापर केल्याने सर्व दोष समाप्त होतात. तसेच वाईट प्रवृत्ती नष्ट होतात. तिळाचे तेल दीर्घकालीन समस्या दूर करण्यास मदत करतात आणि जीवनाचे अडथळेही दूर करतात. 

पंचदीपम तेल

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंचदीपा तेल अथवा पंचदीपम तेलाचा वापर करून दिवे पेटवले पाहिजेत. या तेलामुळे तुमच्या घरात सुख, स्वास्थ, धन, प्रसिद्धी आणि समृ्द्धी येते. पंच दीपम तेल हे योग्य आणि शुद्ध अशा ५ तेलांचे मिश्रण आहे. 

मोहरीचे तेल

दिवे पेटवण्यासाठी मोहरीचे तेल हा चांगला पर्याय आहे. दिवे पेटवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने शनिसंबंधित दोष दूर होतात. तसेच रोगांपासूनही मुक्ती मिळते. 

नारळाचे तेल

भारतात नारळाचे तेलही हा एक चांगला पर्याय आहे. असं म्हटलं जातं की पुजेच्या दिव्यांमध्ये या तेलाचा वापर केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. यासाठी तुम्ही दिव्यांमध्ये नारळाचे तेल वापरू शकता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी