Vastu Shastra: घरात 'या' वस्तू परत-परत पडत असतील तर असते अशुभ संकेत, कुटुंबाला सोसावे लागते नुकसान

सनातन धर्म कोणतेही कार्य करताना वास्तूशास्त्राकडे खूप लक्ष देत असते. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगतल्या आहेत, त्यातील एक गोष्ट म्हणजे जमिनीवर वस्तू पडण्याामागेही अशुभ संकेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Vastu Shastra
Vastu Shastra: घरात 'या' वस्तू परत-परत पडल्या तर असते अशुभ  

थोडं पण कामाचं

  • घरात तेल वारंवार पडत असेल तर कुटुंबाला पैशाचे नुकसान होत असते.
  • मीठ पडल्याने वास्तू दोष असल्याचे लक्षण असते.
  • घरात काळी मिरी खाली पडली तर नवरा-बायकोचे भांडण होण्याची असते शक्यता.

नवी दिल्ली : सनातन धर्म कोणतेही कार्य करताना वास्तूशास्त्राकडे खूप लक्ष देत असते. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगतल्या आहेत, त्यातील एक गोष्ट म्हणजे जमिनीवर वस्तू पडण्याामागेही अशुभ संकेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. वास्तूशास्त्रानुसार जर या वस्तू परत-परत खाली पडत असतील तर आपल्या वास्तूमध्ये काहीतरी कमी आहे याचे संकेत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंविषयी सांगणार आहोत. कोणत्या वस्तू जमिनीवर पडल्याने अशुभ मानले जाते. 

जर स्वयंपाकघरात दूध सांडले तर 

कित्येकदा असे घडते की आपण स्वयंपाकघरात दूध गरम करण्यासाठी ठेवतो आणि नंतर ते विसरतो. ज्यामुळे दूध ऊत जात असते आणि स्वयंपाकघरात दूध सांडले जात असते. कधी-कधी आपल्या हातातून दुधाचे भांडे सटकून खाली पडत असते. ह्या गोष्टी कधी-कधी होत असतील तर काही हरकत नाही. परंतु जर नेहमी आणि वारंवार या गोष्टी घडत होत असतील तर तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मक शक्तींचा वास आहे, याचे संकेत मिळत असतात. 

खाद्यतेल जमिनीवर सांडले तर 

धार्मिक मान्यतेनुसार, तेलचा संबंध हा शनिदेवाशी असतो. शनी देवाच्या क्रोधापासून किंवा वक्र दृष्टीपासून वाचण्यासाठी आपण तेलाचे दान देखील करत असतो. जर अशात जर भाजीचे तेल घराच्या फरशीवर सांडले जात असेल किंवा पडत असेल तर वास्तूशास्त्रामध्ये याला अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात आणि कुटुंबाला पैशाचे नुकसान देखील सहन करावे लागू शकते.

जमिनीवर मीठ पडणे आहे दुर्भाग्य 

आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये जेवणानंतर मीठ अत्यंत महत्वाचे मानले जाते. अशा परिस्थितीत जर घरात मीठ विखुरलेले असेल तर ते अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मीठ खाली पडणे शुक्र आणि चंद्राशी संबंधित नकारात्मक प्रभाव दर्शवते. मान्यतेनुसार, जर तुमच्या घरात वारंवार मीठ पडल्याच्या घटना घडत असतील, तर हे तुमच्या घरात काही वास्तू दोष असल्याचे लक्षण आहे. जे काढून टाकणे आवश्यक आहे.

अन्नपदार्थ खाली पडण्याची काय आहेत संकेत 

कधीकधी आपल्या हातातून अन्न किंवा इतर खाद्यपदार्थांची ताट पडतो. या घटनेत काहीही असामान्य नाही. तथापि, जर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असतील, तर हे समजले पाहिजे की काहीतरी गडबड असल्याचे समजले पाहिजे.  अन्न पडणे हे अन्नपूर्णा देवी तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल रागावल्याचे लक्षण आहे.  अशा परिस्थितीत अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी तिचे चित्र स्वयंपाकघरात लावणे आवश्यक आहे. 

काळी मिरी पडल्याने काय होते नुकसान 

हातातून पडलेली आणि जमिनीवर काळी मिरी पडणे हे अशुभतेचे संकेत मानले जाते. मान्यतेनुसार, यामुळे नात्यात तणाव वाढतो. यामुळे पती -पत्नीमध्ये मतभेद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे.  जर असे कधी घडले, तर तो दिवस शांततेने संयमीतपणे व्यतीत केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये.

(नोट: या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्सनाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी