Vastu Shastra Tips: काच फुटल्यावर मिळतात अनेक गोष्टींचे संकेत, जाणून घ्या ते शुभ की अशुभ

Vastu Shastra For Breaking Mirror: मांजराचं रडणं, घराच्या छतावर कावळे ओरडणे, कुत्र्याचं रडणं, स्वप्नात साप दिसणं किंवा मांजर रस्तात चालताना मध्ये येणं, या आणि अशा अनेक घटना आहेत ज्याचा संबंध शुभ आणि अशुभ याच्याशी लावण्यात येतो.

Vastu Shastra For Breaking Mirror
काच फुटणं शुभ की अशुभ, जाणून घ्या त्यामागचं रहस्य 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) घराशी संबंधित सर्व गोष्टी सांगण्यात येतात.
  • शुभ-अशुभ याबद्दल बोलायचं झाल्यास या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
  • यापैकीच एक म्हणजे काच फुटणे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की काच फुटणे शुभ आहे की अशुभ.

नवी दिल्ली: Vastu Shastra Tips: वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) घराशी संबंधित सर्व गोष्टी सांगण्यात येतात. वास्तूनुसार घरात ठेवण्यात येणाऱ्या वस्तू ठेवण्याची जागा किंवा त्या घरात न ठेवणं याला विशेष अर्थ आहे. घरात असलेल्या वस्तूंचा परिणाम माणसाच्या जीवनावर होताना दिसतो. दरम्यान कधीकधी काही गोष्टी विज्ञानाशी संबंधित देखील असतात. त्यामुळे शुभ-अशुभ याबद्दल बोलायचं झाल्यास या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मांजराचं रडणं, घराच्या छतावर कावळे ओरडणे, कुत्र्याचं रडणं, स्वप्नात साप दिसणं किंवा मांजर रस्तात चालताना मध्ये येणं, या आणि अशा अनेक घटना आहेत ज्याचा संबंध शुभ आणि अशुभ याच्याशी लावण्यात येतो. यापैकीच एक म्हणजे काच फुटणे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की काच फुटणे शुभ आहे की अशुभ. 

काच फुटणे शुभ की अशुभ?

काच फुटणे याबाबत लोकांच्या मनात वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्या शुभ प्रसंगी काच, आरसा किंवा काचेची कोणतीही वस्तू फुटली तर ते खूप अशुभ आहे. तर काही लोक मानतात की काच फुटणं शुभ आहे आणि काही चांगली बातमी मिळण्याची चाहूल आहे. वास्तूनुसार काच फुटणं हे शुभ मानलं जातं. पण वास्तुशास्त्रात काच फुटण्याबाबत सांगण्यात आलं आहे की, काच तेव्हाच फुटते जेव्हा तुमच्यावर संकट कोसळते. तात्पर्य असं की, तुमच्यावर येणारी संकटं काच स्वतःवर घेते आणि ती फुटते त्यामुळे तुमच्यावरील संकट टळतं. 

अधिक वाचा-  NCB च्या क्लीन चीटनंतर शाहरूख खानच्या लेकाचा नवा Video लीक 

काच फुटली असेल तर फेकून द्या

वास्तूनुसार काच फुटल्यानंतर लगेच घराबाहेर फेकून द्यावी. काच फुटणं म्हणजे आपल्यावर येणारी संकटं मोडणे असा समज आहे. अशा स्थितीत घराच्या तुटलेल्या काचा लवकरात लवकर फेकून द्या. 

अशा वेळी काच फुटणं मानलं जात शुभ

घराच्या खिडकी आणि दाराची काच फुटली किंवा त्यामध्ये तडा गेला असेल तर ते अशुभ मानलं जात नाही तर ते शुभ मानलं जातं. अशी घटना सूचित करते की तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे किंवा तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. 

विज्ञानात काच फुटणं म्हणजे काय? 

काच किंवा आरासा फुटणं हे शास्त्रात शुभ किंवा अशुभ मानलं जात नाही. उलट, विज्ञानानुसार, काच ही एक प्रकारची वस्तू आहे आणि ती वापरत असताना हातातून निसटल्यावर किंवा काही कारणानं फुटते. 

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवरील सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी