Vastu Shastra : या दिशेला बसून जेवल्यास येते दरीद्री, जाणून घ्या काय आहेत वास्तूशास्त्राचे नियम

वास्तूशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्या प्रमाणे पुजेसाठी ईशान्यकडील जागा महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगळ्या दिशा ठरवण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्रानुसार खाताना, पितानाही दिशेची काळजी घेतली पाहिजे.

food eating
जेवण्याची दिशा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तूशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
  • वेगवेगळ्या कामांसाठी वेगळ्या दिशा ठरवण्यात आल्या आहेत.

Vastu Shastra : मुंबई : वास्तू शास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्या प्रमाणे पुजेसाठी ईशान्यकडील जागा महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगळ्या दिशा ठरवण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्रानुसार खाताना, पितानाही दिशेची काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया जेवणाच्या वेळी वास्तूशास्त्राचे नियम. (vastu shastra tips for eating and dining at home)

जेवण्यासाठी कुठली दिशा योग्य?

  1. वास्तूशास्त्रानुसार पूर्व दिशेचा संबंध देवांशी जोडलेला आहे. या दिशेला बसून जेवल्यास सर्व आजार बरे होतात. तसेच सर्व देवी देवतांचे आशिर्वादही मिळतात. याशिवाय दीर्घआयुष्याचे वरदानही मिळते.
  2. उत्तर दिशाही देवी देवतांची मानली गेली आहे. या दिशेला लक्षीमाता आणि धनदेवता कुबेर यांचा संबंध असतो. या दिशेला बसून भोजन केल्यास घरात धनलाभ होतो. कुटुंबप्रमुखाने या दिशेला बसून जेवण करणे हे शुभ मानले जाते. 
  3. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी पश्चिम दिशा शुभ मानली जारे. या दिशेला बसून जेवल्यास प्रकृती उत्तम राहते असे म्हटले जाते.  
  4. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला बसून जेवण करणे अशुभ मानले जाते. या दिशेला बसून जेवल्यास घरात दरीद्री येते तसेच माणूस दिवाळखोर होतो असेही सांगितले जाते. 
  5. घरात कोणी पाहुणे आल्यास त्याला पश्चिमेकडे बसून जेवू घालणे फायदेशीर ठरेल. तसेच उत्तर किंवा पूर्वेला बसून पाहुण्यांनी भोजन घेतल्यास फायद होतो. यामुळे घरात धनलाभ होतो. घरात जर डायनिंग टेबल असेल तर तो टेबल घराच्या दक्षिण किंवा पश्चिमेकडे ठेवा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी