Vastu Tips For Home: घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका 'या' गोष्टी, करावा लागेल आर्थिक संकटाचा सामना

Vastu Tips:अनेक लोकं आपल्या घरामध्ये कुठेही कुठलीही वस्तू ठेवतात. त्यामुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर वाईट होण्याची शक्यता आहे.

vastu tips
घराच्या ईशान्य दिशेला या गोष्टी ठेवू नका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून नकारात्मक आणि सकारात्मक अशी ऊर्जा बाहेर पडत असते.
  • घराच्या उत्तर पूर्व दिशेला कोणत्या वस्तू ठेवू नयेत. कारण या गोष्टी ठेवल्यानं व्यक्तीच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो.
  • वास्तुशास्त्रानुसार, घरातली उत्तर दिशा संपत्तीची मानली जाते आणि पूर्व दिशेला देवतांचा वास असतो.

नवी दिल्ली: Vastu Tips For North East Direction: घरातील प्रत्येक कोपरा हा वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून नकारात्मक आणि सकारात्मक अशी ऊर्जा बाहेर पडत असते. या ऊर्जेचा परिणाम घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे घराच्या प्रत्येक दिशेसाठी बनवण्यात आलेल्या काही वास्तूचे नियम पाळणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की, अनेक लोकं आपल्या घरामध्ये कुठेही कुठलीही वस्तू ठेवतात. त्यामुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर वाईट होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे आज जाणून घेऊया घराच्या उत्तर पूर्व दिशेला कोणत्या वस्तू ठेवू नयेत. कारण या गोष्टी ठेवल्यानं व्यक्तीच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो. यामुळे नात्यात दुरावा येतो. म्हणून जाणून घेऊया की कोणत्या वस्तू उत्तर पूर्व दिशेला ठेवू नयेत.  वास्तुशास्त्रानुसार, घरातली उत्तर दिशा संपत्तीची मानली जाते आणि पूर्व दिशेला देवतांचा वास असतो. त्यामुळे उत्तर पूर्व दिशेला ईशान्य दिशा असंही म्हटलं जातं.  मंदिरासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय जाणून घ्या या दिशेचे काही वास्तू नियम.

अधिक वाचा-  Rahul Dravid: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट, राहुल द्रविडसोबत आहे खास नातं

या गोष्टी ठेवू नये ईशान्य दिशेला

उत्तर- पूर्व दिशेला इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार ईशान्येकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत. त्यात फ्रीज, कुलर, वॉशिंग मशीन यांसारखी वस्तू ठेवू नयेत. कारण या गोष्टी उष्णता निर्माण करतात, त्यामुळे नात्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे दुरावा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. 

शूज आणि चप्पल ही ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नयेत. कारण ही दिशा त्यांच्या अस्वच्छतेनं प्रदूषित होते. यामुळे देवी लक्ष्मीला इतर देवी-देवतांचा आशीर्वाद मिळत नाही. अशा स्थितीत पैसे येण्याची समस्या निर्माण होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

जड वस्तू ईशान्य दिशेला ठेवू नका

जड वस्तू ईशान्य दिशेला अजिबात ठेवू नये. या दिशेला मशिनरी किंवा फर्निचरसारख्या जड वस्तू ठेवणं टाळावं. 

ईशान्य दिशेला जिना नसावा

ईशान्येलाही जिने नसावेत. कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होतात ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते.

अधिक वाचा-  Aaditya Thackeray Speech In Rain: आदित्य ठाकरेंची पवार स्टाईल, मैदानात धो-धो पावसात भिजत शिवसैनिकांशी संवाद

ईशान्य दिशेला शौचालय नको

ईशान्य दिशेला शौचालय बांधू नका. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वेगानं येऊ लागते. ज्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

या वस्तू उत्तर पूर्व दिशेला ठेवा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मंदिर म्हणजे देवघर असणं शुभ मानले जाते. याशिवाय कुबेराचा फोटो किंवा मूर्ती या दिशेला ठेवणं शुभ म्हटलं जाते. झाडे लावायची असतील तर मनी प्लांट, तुळस यासारखी झाडे लावू शकता. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

अस्वीकरण:  'या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी