Important Vastu Tips: सावधान... रात्री झोपताना चुकूनही करू नका 'या' चूका; कायम दूर ठेवा 'या' 5 वस्तू

Vastu Tips While Sleeping At Night:रात्री झोपताना (Sleeping) 5 गोष्टी चुकूनही त्या डोक्याजवळ ठेवू नका. नाहीतर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी.

Vast Tips For Sleeping
या 5 गोष्टी डोक्याजवळ विसरून झोपू नका 
थोडं पण कामाचं
  • रात्री झोपताना (Sleeping) 5 गोष्टी चुकूनही त्या डोक्याजवळ ठेवू नका.
  • एखादी व्यक्ती झोपेत असतानाही नेहमी तणावात राहते. ज्यामुळे त्याच्या संपूर्ण दिनचर्येवर परिणाम होत असतो.
  • झोपताना उशीखाली किंवा डोक्याच्या बाजून पर्स ठेवून झोपण्याची सवय अनेकांना असते.

नवी दिल्ली: Vastu Tips For Positive Energy: सर्वच जण आपआपलं आयुष्य पद्धतशीरपणे जगण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र तरीही बऱ्याचदा असं होतं व्यक्तीचं जीवन रूळावरून घसरलेलं दिसतं. घरात अनेक संकटं येतात. त्यातच आर्थिक संकटाचा (financial crisis)  सामना करावा लागतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किंवा घरात येणाऱ्या अडचणी छोट्या छोट्या गोष्टींवरून सुरू होतात. एखाद्याच्या घरात आजारानं अडचणीला सुरूवात होते. पण खूप कमी लोकांना माहित आहे की, हे सर्व तुमच्या पद्धतीशी संबंधित आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रात्री झोपताना (Sleeping)  5 गोष्टी चुकूनही त्या डोक्याजवळ ठेवू नका. नाहीतर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी.

वृत्तपत्रे आणि पुस्तके शेजारी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार वृत्तपत्र, पुस्तक किंवा मासिक डोक्यावर किंवा उशीखाली ठेवून कधीही झोपू नये. असं केल्याने, एखादी व्यक्ती झोपेत असतानाही नेहमी तणावात राहते. ज्यामुळे त्याच्या संपूर्ण दिनचर्येवर परिणाम होत असतो. त्यामुळे रात्री झोपताना वर्तमानपत्रे आणि पुस्तक चुकूनही ठेवू नका. 

अधिक वाचा-  Amazon Prime Day Sale 2022: जवळपास अर्ध्या किंमतीला मिळतील स्मार्टफोन, 'या' मोबाईलवर असेल बंपर सूट

नेहमी औषधे स्वतःपासून लांब ठेवून झोपा

अनेक वेळा लोक आजारी असताना औषधे शेजारी ठेवून झोपतात. वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला औषधांची किती आवड आहे. अशा परिस्थितीत, औषध आणि रोग आयुष्यभर तुमच्याशी संपर्क येऊ शकतात. अशाप्रकारे झोपताना नकारात्मक ऊर्जा जीवनात पसरते.  म्हणून, झोपण्यापूर्वी औषधे आपल्यापासून थोडी दूर करून ठेवा. 

उशीखाली पर्स ठेऊन झोपणे चांगले नाही

झोपताना उशीखाली किंवा डोक्याच्या बाजून पर्स ठेवून झोपण्याची सवय अनेकांना असते. जर वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर अशा प्रकारे झोपणे हे दर्शवते की आपण लोभी आहात. असं मानलं जातं की, अशा प्रकारे झोपल्याने घरामध्ये अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात अडकू शकते. तसेच जोडीदारासोबतही तणाव निर्माण होण्यास सुरूवात होते. 

झोपताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर ठेवा

आजकाल मोबाईल, स्मार्ट घड्याळे आणि लॅपटॉप हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. बरेच लोक झोपण्यापूर्वी या गोष्टींवर बराच वेळ घालवतात आणि त्यानंतर ते डोक्याजवळ ठेवून झोपतात. तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल तर लगेच बदला. वास्तूनुसार मोबाईल, स्मार्ट घड्याळ किंवा लॅपटॉप डोक्यावर ठेवून झोपल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अदृश्य किरण उत्सर्जित करतात, ज्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येतो. त्यामुळे रात्री झोपताना ही उपकरणे तुमच्यापासून दूर ठेवावीत.

अधिक वाचा-  रणवीर सिंहच्या 'या' फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग

पाण्याची बाटली दूर ठेवून झोपा

अनेकांना रात्री झोपताना वारंवार पाणी पिण्याची सवय असते. यासाठी ते डोक्याजवळ पाण्याने भरलेली बाटली किंवा भांडे ठेवून झोपतात. या सवयीचे वास्तुशास्त्रात चुकीचे वर्णन करण्यात आलं आहे. वास्तूनुसार पाण्याचा संबंध चंद्राशी असल्यामुळे डोक्यावर पाणी ठेवून झोपल्यानं चंद्र देव प्रभावित होतो. त्यामुळे मानसिक तणाव आणि समस्या वाढू शकतात. याशिवाय रात्रीच्या वेळी पाण्याने भरलेली बाटली किंवा भांडे पडल्यास  त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याला दूर ठेवूनच झोपणं तुमच्यासाठी चांगलं आहे. 

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी