Remedies For Money: खिशात पैसे टिकत नाहीत?, तर मग करा हे खात्रीशीर उपाय

Astro Remedies for Money in Marathi: आर्थिक अडचणीच्या वेळी अनावश्यक पैसा खर्च करणे, पैशाची वारंवार हानी होणे किंवा नेहमी पैशांची कमतरता असणे, या समस्या अनेकांच्या आयुष्यात घडत असतात.

Remedies for Money
पर्समध्ये पैसे टिकत नाहीत तर उपाय करा 
थोडं पण कामाचं
  • अनेकदा बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आर्थिक अडचण निर्माण होते.
  • आर्थिक अडचणीच्या वेळी अनावश्यक पैसा खर्च करणे, पैशाची वारंवार हानी होणे किंवा नेहमी पैशांची कमतरता असणे, या समस्या अनेकांच्या आयुष्यात घडत असतात.
  • पैशांची कमतरतेच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात सांगितलेले काही उपाय केले तर धनाचा ओघ (money increases) वेगाने वाढतो.

मुंबई: Most powerful tricks for money in Marathi: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात पैसा (Money)  खूप महत्त्वाचा आहे. जर आयुष्यात पैशांची चणचण असेल तर अनेक समस्या उद्धभवतात. पैशांची चणचण (Financial problems) ही आयुष्यातील समस्यांचं मूळ कारण आहे. अनेकदा बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आर्थिक अडचण निर्माण होते. आर्थिक अडचणीच्या वेळी अनावश्यक पैसा खर्च करणे, पैशाची वारंवार हानी होणे किंवा नेहमी पैशांची कमतरता असणे, या समस्या अनेकांच्या आयुष्यात घडत असतात. महिना संपण्याच्या बरेच दिवस आधी लोकांच्या पर्स रिकाम्या झालेल्या असतात. पैशाची ही कमतरता त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या घेऊन येते आणि त्यांना सुखानं जगू देत नाही. मात्र पैशांची कमतरतेच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात सांगितलेले काही उपाय केले तर धनाचा ओघ (money increases) वेगाने वाढतो. त्यामुळे पैशाच्या कमतरतेवर मात करून श्रीमंत होण्यासाठी ज्योतिषीय उपाय करा. (Vastu tips for make your wallet full of money Remedies read in marathi)

अधिक वाचा-  किचनमधल्या 'या' वस्तू कधीही देऊ नका कोणाला, पैसा टिकणार नाही घरात 

पर्समध्ये पैसे टिकत नाहीत तर उपाय करा

जर पैसे लवकर आणि जास्त खर्च होत असतील आणि पर्स महिन्यातील बहुतांश वेळ रिकामी राहत असेल तर पर्समध्ये दीड इंच लांब आणि एक इंच रुंद चांदीचा तुकडा महालक्ष्मीच्या मंत्राने म्हणून आणि हिरव्या कपड्यात गुंडाळा. यामुळे अनावश्यक खर्चही थांबेल आणि पैशाचे नवीन मार्ग खुले होतील.

कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असेल किंवा राहूची महादशा चालू असेल तर अशी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते. ती व्यक्ती व्यसनही सोडू शकत नाही आणि त्याचा पैसा आणि मालमत्ता वाया जाते. त्यामुळे लगेच व्यसन सोडण्याचा प्रयत्न करू नका. अशा स्थितीत राहु शांतीसाठी शनिवारी व्रत ठेवा. कावळ्यांना गोड भाकरी खाऊ घाला. गरीब मुलीच्या लग्नात दान किंवा कन्यादान करा.

राहूच्या वाईट स्थितीमुळे खूप खर्च होतो आणि व्यक्ती गरीब होतो. हे टाळण्यासाठी भगवान शंकराची मनापासून पूजा करावी. लवकरच या समस्येतून सुटका होईल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Time Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी