Vastu Tips: या दिशेला चुकूनही बनवू नका टॉयलेट, किचन आणि तिजोरी नाहीतर होईल मोठे नुकसान

वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा (Vastu Shashtra direction tips) ही अत्यंत महत्त्वाची दिशा मानली जाते. ईशान्य दिशा उत्तर-पूर्व दिशेत असते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या दिशेत चुकूनही करू नयेत. तर काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिशेला ठेवणे खूप शुभ आहेत.

Don't make in Toilets, kitchens and safes this direction
Vastu Tips: या दिशेला चुकूनही बनवू नका टॉयलेट, किचन   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • पूजागृह, बाल्कनी, व्हरांडा, भूमिगत टाकी, नलिका, स्वागत कक्षसाठी ईशान्य दिशा असते.
 • या दिशेला स्वंयपाक घर, देवरा ठेवू नये.
 • ईशान्य पवित्र आणि प्रकाश समान असतो. त्यामुळे या घरांमध्ये राहणारे लोक ज्ञानी आणि बुद्धिमान असतात.

Vastu Tips: वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही अत्यंत महत्त्वाची दिशा मानली जाते. ईशान्य दिशा उत्तर-पूर्व दिशेत असते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या दिशेत चुकूनही करू नयेत. तर काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिशेला ठेवणे खूप शुभ आहेत. दरम्यान, वास्तुशास्त्रातील ईशान्य दिशेचे महत्त्व काय आहे किंवा या दिशेला कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी अजिबात नसाव्यात हे वास्तु आणि ज्योतिष तज्ज्ञ पंडित मनोज कुमार यांना मिश्रा यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. 

 • पूजागृह, बाल्कनी, व्हरांडा, भूमिगत टाकी, नलिका, स्वागत कक्ष आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ईशान्य दिशा अतिशय योग्य मानली जाते. 
 • ईशान्य दिशेला कोणताच भार नसावा, यासाठी शौचालय आणि स्वयंपाकघर या दिशेला बांधू नये.  जर काही कारणास्तव ईशान्येला लागून स्वयंपाकघर असेल तर त्या घरात राहणाऱ्या सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वंश वाढीमध्ये अडचण येते. पैशाचा खर्च अधिक वाढतो आणि घरातील महिलांचे आरोग्य बिघडते. 
 • ईशान्य कोन अतिशय सुंदर ठेवावा, कारण या दिशेला देवाचा वास असतो. 
 • चुकीच्या दिशेला देवघर ठेवल्यास किंवा देव ठेवल्यानं सकारात्मकता कमी होत असते. घरातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. दरम्यान या दिशेला झाड लावू नये, यामुळे या दिशेला तुळसी लावणं शुभ असते.
 • तिजोरी ईशान्य दिशेला ठेवू नये, अन्यथा अनावश्यक खर्च वाढतो तसेच पैसे चोरी होण्याचा धोकाही वाढतो. 
 • भगवान शिव हे ईशान्य किंवा ईशान्येचे स्वामी आहेत आणि ते गुरू ग्रहाशी संबंधित आहेत. ईशान्येला कधीही गोलाकार करू नये, हे कोपरे कधीही बंद करू नयेत. 
 • या दिशेला कधीही झाडू किंवा जड वस्तू ठेवू नका. ईशान्य पवित्र आणि प्रकाश समान असतो. त्यामुळे या घरांमध्ये राहणारे लोक ज्ञानी आणि बुद्धिमान असतात. 
 • चुकूनही किचन रूम ईशान्य दिशेला बांधली असेल तर घरात संकटे येतात आणि संपत्तीचा नाश होतो.
 • काही कारणास्तव ईशान्य कोन कापला किंवा विकृत झाला तर मुले विकृत किंवा अपंग जन्माला येतात. ईशान्य दिशेला शिडी बांधणे देखील अशुभ मानले जाते. 
 • ईशान्य दिशेला बेट, टेकडी, धबधबा इत्यादींचे चित्र लावणे देखील अशुभ आहे आणि असे केल्यास घरातील महिलांचे आरोग्य बिघडू शकते.   
 • ईशान्य कोपर्‍यात कचरा ठेवल्याने किंवा दगडांचा साठा ठेवल्याने किंवा तो उंच केल्याने सामाजिक शत्रुत्व वाढते आणि त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी