Tips for early marriage : घरात हिरवी झाडे असतील तर सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो. वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात. वास्तुशास्त्रानुसार हिरवीगार झाडे प्रगती, सुख आणि समृद्धी येण्यास मदत करतात. घरामध्ये रोपे लावल्याने आरोग्यासोबत धनप्राप्तीचा मार्गही खुला होतो. याशिवाय घरामध्ये काही रोपे लावल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. यापैकी एक वनस्पती म्हणजे Peonia. वास्तुशास्त्रानुसार लग्न होत नसेल किंवा काही कारणास्तव पुढे ढकलले जात असेल तर घरामध्ये पियोनिया फुलाचे रोप लावावे. पेओनिया फुलाला फुलांची राणी म्हणतात. ही फुले सौंदर्य आणि रोमान्सचे प्रतीक मानली जातात. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पतीबद्दल...
अधिक वाचा : Vastu Tips: चुकून सुद्धा घरात ठेवू नका 'या' 3 गोष्टी, नेहमी डोक्यावर घोंघावेल आर्थिक संकट
वास्तुदोषांमुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्ट वादविवादापर्यंत पोहोचत असेल तर घरामध्ये पेओनिया किंवा त्याच्या रोपाची पेंटिंग लावा. ही वनस्पती दक्षिण-पश्चिम दिशेला लावा, कारण या दिशेचा संबंध कुटुंबात राहणार्या लोकांमधील संबंध दर्शवतो.