Vastu Tips: या टिप्स वापरून पाहा घरातील वातावरण बदलेल अन् सुख-समृद्धीसह मिळेल धन-दौलत

Vastu Tips in Marathi: वास्तूशास्त्रानुसार घरातील सजावट आणि इतर गोष्टी केल्यास नेहमी आनंदाचे वातावरण राहते.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Vastu Tips: वास्तूशास्त्रात घरातील सजावट आणि इतर बाबींच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी वास्तूशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तूशास्त्रात सांगितलेल्याप्रमाणे सजावट केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. जाणून घेऊयात याच संदर्भात.... (vastu tips in marathi for wealth and happiness along with prosperity)

वास्तूशास्त्रानुसार, घरात एखादा छोटा कारंजा, सोन्याचा मासा किंवा वाहती नदी असलेले पेंटिंग लावा. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि संपत्ती येते. परदेशात कामाची संधी शोधत असाल तर घरात विदेशी मुद्रा, उडणारे पक्षी, रेसिं बाईक किंवा कारची पेंटिंग लावा.

घरातील शांततेसाठी दिवा, कापूर दररोज लावा. त्यासोबतच चंदनाचा सुगंध असल्यास आणखी चांगले. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. घर शुद्ध करण्यासाठी सिट्रोनेला आणि दालचिनी चांगले.

हे पण वाचा : रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आहेत सोपे उपाय

एका भांड्यात काही तमालपत्रे जाळा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. 

घराच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा ठेवू नका. 

तुटलेली भांडी वापरणे टाळा. 

हे पण वाचा : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता? मग हे वाचाच...

घरातील अशा काही वस्तू असतील ज्या तुम्ही दीर्घकाळापासून वापरत नाहीत तर अशा वस्तू तात्काळ घरातून बाहेर काढा.

पायऱ्यांच्याखाली किंवा बेडरूममध्ये पूजा खोली नसावी. 

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घंटी लटकवा. वास्तूशास्त्रानुसार, सुखमय संगीत लावा यामुळे घरात सुख-समृद्धी येते. दररोज काही मिनिटांसाठी श्लोक, धार्मिक मंत्र ऐकावेत.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

घराच्या आवारात गार्डन बनवण्याबाबत विचार करावा. ज्या ठिकाणी तुम्ही काही काळ बसून ताजी ऊर्जा मिळवू शकता. 

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रंगरंगोटी करताना काळ्या रंगाचा वापर करू नये. 

घराच्या हॉलमध्ये असलेली सर्व इलेक्ट्रिक उपकरणे ही दक्षिण-पूर्व दिशेला असावी.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी