Money Plant vastu tips: घरात आहे मनी प्लांट मग आजच बांधा लाल धागा, होईल भरभराट

Vastu Tips: वास्तूशास्त्रात मनी प्लांट संदर्भात अनेक उपाय सूचवण्यात आले आहेत. हा उपाय करताच तुमची भरभराट होईल आणि तुम्हाल यश प्राप्त होईल. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • मनी प्लांटच्या झाडामुळे येऊ शकतात अनेक समस्या
  • मनी प्लांटला लाल धागा बांधल्याने होईल भरभराट 
  • शुक्र ग्रहाचं झाड आहे मनी प्लांट

Vastu tips for Money Plant in house: अनेकजण आपल्या घरात मनी प्लांट लावतात. या झाडाची काटेरी पाने सुंदर दिसतात. यामुळेच लोक घराच्या बाहेर किंवा गॅलरीपासून ते ऑफिस किंवा आपल्या खोलीत मनी प्लांट लावतात. मनी प्लांट सकारात्मक ऊर्जा देतं. वास्तूमध्ये मनी प्लांटबद्दल अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण हा एक उपाय केल्याने मनी प्लांटपासून शुभकार्य अनेक पटींनी वाढते आणि घरामध्ये पैशांचा वर्षाव होतो. (vastu tips in marathi tie red thread to money plant of your home you will get success)

मनी प्लांट शुक्र ग्रहाशी संबंधित

वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांटचे रोप घरात ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. कारण मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. ज्या घरात मनी प्लांट योग्य दिशेला लावला जातो तिथे शुक्र ग्रहाचा कोणताही वाईट प्रभाव पडत नाही आणि सुख-समृद्धी राहते.

अधिक वाचा : Night Dream: रात्री तुम्हालाही 'तसे' स्वप्न पडतात... या स्वप्नांचा अर्थ आणि लक्षणे काय

हा धागा मनी प्लांटला बांधा

वास्तूनुसार, मनी प्लांटच्या रोपाला लाल रंगाचा धागा बांधणे शुभ असते. शुक्रवारच्या दिवशी मनी प्लांटच्या रोपाला लाल रंगाचा धागा बांधा. असं केल्याने खूप यश मिळतं आणि घरातून आर्थिक समस्या दूर होतात. असं म्हटलं जातं की, लाल धागा बांधल्याने मनी प्लांट ज्या वेगाने वाढतं त्याच वेगाने भरभराटही होते.

असा बांधा लाल धागा

मनी प्लांटला लाल धागा बांधताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर लक्ष्मी मातेची पूजा करा आणि धूप लावा. मनी प्लांटला जो धागा बांधणार आहात तो धागा लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पित करा. त्यानंतर आरती करा आणि मग लाल धाग्यावर कुंकु लावा. त्यानंतर धागे मनी प्लांटला बांधा. हा उपाय केल्यानंतर काही दिवसांनीच तुम्हाला चमत्कारिक लाभ दिसू लागतील. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य माहिती आणि सामग्रीवर आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताचं समर्थन करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी