Vastu Tips For Purse: : चुकूनही पाकिटात ठेवू नका या वस्तू, ओढवू शकतात मोठी संकट, वाचा सविस्तर

आपण बाहेर जाताना आवर्जून पाकिट नेतो. स्त्री असो वा पुरुष बाहेर जाताना खिशात पाकिट किंवा मोठी पर्स कॅरी करतात. छोट्या मोठ्या वस्तू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे ठेवण्यासाठी पाकिटाचा वापर केला जातो. काही लोक पाकिटात गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात. अनेक वेळेला काही वस्तूंची गरजही नसते. परंतु पाकिटात काही वस्तू ठेवणे  चुकीचे आहे.

wallet
पाकिट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आपण बाहेर जाताना आवर्जून पाकिट नेतो. स्त्री असो वा पुरुष बाहेर जाताना खिशात पाकिट किंवा मोठी पर्स कॅरी करतात.
  • काही लोक पाकिटात गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात.
  • अनेक वेळेला काही वस्तूंची गरजही नसते. परंतु पाकिटात काही वस्तू ठेवणे  चुकीचे आहे.

Things Should Not Be Kept In The Purse: आपण बाहेर जाताना आवर्जून पाकिट नेतो. स्त्री असो वा पुरुष बाहेर जाताना खिशात पाकिट किंवा मोठी पर्स कॅरी करतात. छोट्या मोठ्या वस्तू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे ठेवण्यासाठी पाकिटाचा वापर केला जातो. काही लोक पाकिटात गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात. अनेक वेळेला काही वस्तूंची गरजही नसते. परंतु पाकिटात काही वस्तू ठेवणे  चुकीचे आहे. या सवयीमुळे तुमच्यावर संकट येऊ शकतं. पाकिटात कुठल्या वस्तू नाही ठेवल्या पाहिजे यासाठी वास्तू नियम जाणून घ्यावेत. जाणून घेऊया पाकिटात कुठल्या वस्तू ठेवणे टाळले पाहिजे.

जुनी बिलं

काही लोकांना सवय असते, खरेदी केल्यानंतर बिलं पाकिटात ठेवण्याची. परंतु वास्तू शास्त्राच्या नियमांत असे करणे चुकीचे सांगितले आहे. खरेदी केलेल्याची बिले फार काळ पाकिटात ठेवू नये. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते आणि पाकिटात  फार काळ पैसे टिकत नाही. अशा वेळी गरज नसलेली बिलं फेकून द्या आणि गरजेची बिलं दुसर्‍या ठिकाणी सुरक्षित ठेवा. 

पाकिटात ठेवू नका फोटो

अनेकांना पाकिटात देवी देवतांची किंवा फॅमिली फोटो ठेवण्याची सवय असते. पाकिटात फोटो ठेवल्यास व्यक्तीवर कर्ज वाढतं आणि वास्तूदोषही लागतो. पाकिटात लक्ष्मी मातेचा वास असतो अशा वेळी इतर फोटो ठेवणे अशूभ मानले जाते. 


नोटा मोडून ठेवू नका

पाकिटात कधी नोटा मोडून ठेवू नयेत. त्या नेहमीच उघडून ठेवाव्यात. नोटा मोडून ठेवल्यास वास्तू दोष लागतो आणि व्यक्तिला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. 

पाकिटात ठेवा थोडे तांदूळ

वास्तू शास्त्राच्या नियमानुसार पाकिटात थोडेसे तांदूळ ठेवावे. यामुळे आर्थिक स्थैर्य लाभते आणि लक्ष्मीमातेची कृपा राहते. 

नोटा आणि नाणी ठेवा वेगळी

पाकिटात नोटा आणि नाणी वेगवेगळी ठेवा. पाकिटात वेगळ्या कप्प्यात नाणी ठेवा आणि नोटा मोडून ठेवू नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी