Vastu Tips: वास्तूनुसार घरात लावा 'हे' झाडं; होईल भरभराट, लक्ष्मी कायमच प्रसन्न राहिल

Vastu Tips For Money: घरातील सुखासाठी (happiness at home) लोक विविध उपाय करत असतात. हे उपाय केल्यानंतर त्यांच्याकडे पैसा येतो. त्यामुळे त्यांना हवे ते काम करता येते.

planting
घरात लावा 'हे' झाडं, घरात येईल सुख-समृद्धी आणि पैसा 
थोडं पण कामाचं
  • या जगात प्रत्येकाला नेहमी आनंदी राहायचे असते.
  • घरातील सुखासाठी (happiness at home) लोक विविध उपाय करत असतात.
  • हे उपाय केल्यानंतर त्यांच्याकडे पैसा येतो. त्यामुळे त्यांना हवे ते काम करता येते.

नवी दिल्ली: overcome lack of money Tips: या जगात प्रत्येकाला नेहमी आनंदी राहायचे असते. घरातील सुखासाठी (happiness at home) लोक विविध उपाय करत असतात. हे उपाय केल्यानंतर त्यांच्याकडे पैसा येतो. त्यामुळे त्यांना हवे ते काम करता येते. तुमचे इच्छित काम पूर्ण करण्यासाठी घरामध्ये पारिजातचे रोप (Parijat plant) लावा. तुम्ही नेहमी आनंदी राहाल. 

पारिजात घरी लावल्यानं काय फायदे होतात?

घरामध्ये पारिजातचे झाड लावल्याने माता लक्ष्मी स्वतः त्या घरात निवास करते. पारिजातच्या फुलांनी लक्ष्मीची पूजा केल्यानं लक्ष्मीचं वरदान मिळते.

अधिक वाचा-  जगातील सर्वात धोकादायक Tourist Place

पारिजात रोप कोठे लावावे?

पारिजात वनस्पती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावी. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, घरात सुख-शांती कायम राहते. हे रोप घराच्या पश्चिम दिशेलाही लावता येते आणि उत्तर-पश्चिम दिशाही यासाठी योग्य असते. हे रोप घरामध्ये लावल्याने सदैव शांती राहते आणि घरात देवी लक्ष्मीची नेहमी उपस्थिती असते. घरामध्ये पारिजाताचे रोप लावल्याने घरात शांती राहते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. मान्यतेनुसार ज्या घरात पारिजात वनस्पती असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला पारिजाताचे फूल अर्पण केल्यानं धनाची प्राप्ती होते.

पारिजात कोणत्या दिवशी लावावा?

घरामध्ये पारिजात रोप लावल्यानंतर आनंद येऊ लागतो. हे अत्यंत शुभ मानले जाते. सोमवारी किंवा गुरुवारी घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पारिजाताच्या फुलांचा सुगंध सर्व तणाव दूर करतो. यासोबतच त्याचा सुगंध घरामध्ये जितका दूर जातो तिथपर्यंत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. असे मानले जाते की,  जेथे ही वनस्पती लावली जाते तेथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. वास्तुशास्त्रात क्रॉसुला वनस्पती खूप भाग्यवान असल्याचे म्हटले आहे. याचे सेवन केल्याने घरात पैशांचा ओघ वाढतो आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. क्रॉसुलाच्या वनस्पतीला सामान्य भाषेत जेड ट्री, लकी ट्री, मनी ट्री असेही म्हणतात. वास्तुशास्त्रात याला संपत्तीची वनस्पती म्हटले जाते.

घरात कोणते झाडं लावू नये?

मान्यतेनुसार पूर्वेला पिंपळ, दक्षिणेला पाकड, निंब,  नैऋत्यला कदंब, पश्चिमेला काटेरी झाडे, उत्तरेला गुलार, केळी, आणि कडाळीची झाडे लावू नयेत. मात्र यासाठी वास्तुविशारदाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी