घरात मनी प्लांट लावला आहे?, प्लांटसंबंधी 'या' चुका तुम्हाला पडू शकतात महागात,काळजी घ्या

Vastu Tips: वास्तुशास्त्राच्या मते, अशी काही झाडे आहेत जी घराच्या आत लावल्यास त्याचा अधिक फायदा होतो. त्याच वेळी, काही झाडे अशीही असतात, जी घराबाहेर लावल्याच अधिक शुभ समजली जातात.

Vastu Tips money plant
मनी प्लांटला लावावी लाल रिबीन  
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वास्तुशास्त्राला (Architecture) खूप महत्त्व आहे.
  • वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात.
  • आपल्या घरातील वास्तुशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर वस्तू आणि झाडे-वनस्पतींबाबत विशेष नियम सांगण्यात आले आहेत.

मुंबई: Vastu Tips: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वास्तुशास्त्राला (Architecture)  खूप महत्त्व आहे. वास्तु दोषाचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावरही झालेला आपण पाहिला असेल. वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. यातून केवळ घरातील वातावरण प्रसन्न करता येत नाही, तर व्यक्तीच्या जीवनात प्रगतीचे मार्गही खुले होत असतात. आपल्या घरातील वास्तुशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर वस्तू आणि झाडे-वनस्पतींबाबत विशेष नियम सांगण्यात आले आहेत. 

वास्तुशास्त्राच्या मते, अशी काही झाडे आहेत जी घराच्या आत लावल्यास त्याचा अधिक फायदा होतो. त्याच वेळी, काही झाडे अशीही असतात, जी घराबाहेर लावल्याच अधिक शुभ समजली जातात. यापैकी एक मनी प्लांट आहे, जे पैसे आकर्षित करण्यासाठी असलेलं झाडं असं म्हटलं जातं. इंदूरमध्ये राहणारे ज्योतिषी (Astrologer) आणि पंडित कृष्णकांत शर्मा मनी प्लांट (Money Plant) लावण्याचा योग्य मार्ग आणि योग्य दिशा सांगितली आहे. चला जाणून घेऊया.

अधिक वाचा- संधी चुकवू नका, भारतात बघा Supermoon चा अद्भूत नजारा; जाणून घ्या वेळ

घरात मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रात मनी प्लांट हे पैसे आकर्षित करणारं झाडं मानलं जातं. पण ते पैसे तेव्हाच आकर्षित करतं जेव्हा ते योग्य दिशेला ठेवलं असेल तर.  मनी प्लांट लावण्यासाठी योग्य दिशा ही दक्षिण-पूर्व असल्याचं सांगितलं जात आहे. या दिशेला मनी प्लांट लावल्याने अनेक सकारात्मक परिणाम होतात. जर ते या दिशेला लावलं नाही तर त्याचे उलट परिणाम देखील दिसून येण्याची शक्यता आहे. 

मनी प्लांटला लावावी लाल रिबीन 

वास्तु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, मनी प्लांटला लाल रिबीन किंवा लाल धागा बांधावा. तसं केल्यास शुभ असते. लाल रंग हा प्रगती आणि कीर्तीचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी मनी प्लांटला लाल रंगाची रिबीन बांधल्याने फायदा होतो.

हा उपाय केल्यास मनी प्लांटची खूप वेगानं वाढ होते. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम घरातल्या लोकांच्या प्रगतीवर होतो. वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की, मनी प्लांट जसजसा वाढतो तसाच घरातील व्यक्तीची ही प्रगती होते.

ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा 

वास्तुशास्त्रानुसार, ज्या ठिकाणी तुम्ही मनी प्लांट ठेवणार असाल ती जागा स्वच्छ असावी. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. याशिवाय मनी प्लांट थेट जमिनीवर ठेवू नका हे लक्षात ठेवा. तसंच त्याची पाने जमिनीकडे वाढू देऊ नका. त्याची पाने नेहमी वरच्या दिशेने वाढलेली पाहिजेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी