नवी दिल्ली: Unlucky Plants For Home: वास्तूशास्त्र (Architecture) हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. वास्तुदोष (Vastu Dosh) असेल तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावरही होत असतो. वास्तूतील दोष टाळण्यासाठी लोकं बरेच प्रयत्न करत असतात. तसंच घरात ठेवण्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टी ही घरातील वास्तू दोष दूर करतात. पण घरात असलेल्या अशाही काही गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चुकीचे परिणाम होऊ शकतात. घरात काही झाडं ठेवल्यास त्याचा बराच फायदा होतो पण घरात लावलेली काही झाडं तुमची सुख-शांती ही हिरावून घेऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमच्याकडे अनेक चांगली झाडे ही असतात, जी घरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) आणतात. अशी काही झाडं आहेत जी घरात लावणं टाळावं, ज्या झाडांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. झाडे ही चारही बाजूंनी हिरवळ आणतात. पण घरात झाडे लावण्यापूर्वी काही वास्तु नियमांचंही पालन केले पाहिजे. लोक आपल्या आवडीमुळे महागडे झाडे विकत घेऊन बाग तयार करतात. पण अशी काही झाडे आहेत जी तुमच्या घरातील सुख-शांती भंग करू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार घरात निगेटीव्हिटी निर्माण करणारी झाडं घरी ठेवणं योग्य मानलं जात नाही. वास्तुशास्त्रातही अशा झाडांबद्दल सांगण्यात आलं आहे की, जे लावल्याने घरामध्ये नकारात्मकता येऊ लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही झाडांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या घरातील सुख आणि समृद्धी हिरावून घेऊ शकतात.
काटेरी झाडे
काटेरी झाडं घरात किंवा ऑफिसमध्ये लावू नयेत. गुलाब जरी चांगलं दिसत असलं तरी त्याचे झाडं जरी घरात लावू नये. गुलाबाचे झाड किंवा निवडुंग जरी आकर्षक दिसत असलं तरी घरात कोणतेही काटेरी रोप चुकूनही ठेवू नये.
सुकलेली झाडं
तुमच्या घरातील एखादे रोप सुकलं किंवा वाळलं असेल तर ते अशुभतेचे लक्षण आहे. अशा वनस्पती तुमच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करू शकतात. एवढेच नाही तर जर तुम्ही घरी पुष्पगुच्छ ठेवत असाल तर वाळल्यानंतर लगेचच घरातून काढून टाका. वाळलेल्या झाडांमुळे घरातील शांतता बिघडते.
मेहंदीचं रोप
जरी मेहंदी वनस्पती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असेल तरी पण घरामध्ये लावल्याने त्याचे गुणधर्म बदलतात. असं म्हटलं जात की, मेहंदीच्या रोपावर वाईट आत्मा राहतात, त्यामुळे ही वनस्पती घरात लावणं चांगलं नाही.
बोन्साई वनस्पती
बोन्साई वनस्पती दिसायला सुंदर दिसत असली तरी वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करते. तुमच्या यशाचे सर्व मार्ग बंद करतो. म्हणूनच हे रोप कधीही घरात लावू नये.