Vastu Tips : या गोष्टी घरात ठेवू नयेत, नाहीतर तुम्हाला आर्थिक संकटाला जावे लागेल सामोरे

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 08, 2022 | 20:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

vastu tips : वास्तू टिप्स (vastu tips) वास्तुशास्त्रात सुख, समृद्धी आणि नशिबासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. परंतु काही लोक अशा निरुपयोगी वस्तू आपल्या घरात ठेवतात, ज्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह घरात वाढू लागतो.

वास्तू टिप्स : आर्थिक संकट टाळण्यासाठी
Vastu tips : to avoid financial crises in Life   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वास्तू टिप्स (vastu tips) वास्तुशास्त्रात सुख, समृद्धी आणि नशिबासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
  • काही लोक अशा निरुपयोगी वस्तू आपल्या घरात ठेवतात, ज्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह घरात वाढू लागतो.
  • आजच्या काळात प्रत्येकाला आनंदाने जगायचे आहे. पण अनेक वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही

मुंबई : वास्तू टिप्स (vastu tips) वास्तुशास्त्रात सुख, समृद्धी आणि नशिबासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. परंतु काही लोक अशा निरुपयोगी वस्तू आपल्या घरात ठेवतात, ज्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह घरात वाढू लागतो.

आजच्या काळात प्रत्येकाला आनंदाने जगायचे आहे. पण अनेक वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही. वास्तुशास्त्रानुसार, कधी कधी लहान-लहान चुका होतात ज्याकडे माणूस लक्ष देत नाही आणि या गोष्टी आपल्या प्रगतीमध्ये अडथळा बनतात. त्याचप्रमाणे वास्तूमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात ठेऊ नये. कारण या गोष्टींचा व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो.

अधिक वाचा : 'या' झाडाच्या शेतीतून करता येईल कोटींची कमाई, पाहा कसे

 या वस्तू घरात ठेऊ नका:

तुटलेले जुने चप्पल किंवा बूट : (shoes) 

 वास्तुशास्त्रानुसार जुने तुटलेले चप्पल किंवा बूट ताबडतोब घरातून काढून टाकावी. कारण असे वस्तू घरात ठेवल्याने माणसाला अनेक संकटाना सामोरे जावे लागते. यासोबतच आर्थिक जीवनावरही वाईट परिणाम होतो.

बंद पडलेले घड्याळ : (watches and clock) 

 अनेकांना अशी सवय असते की घड्याळ खराब झाल्यानंतरही ते घरात ठेवतात की त्याची काच किंवा इतर वस्तू आतल्या मशीन वापरल्या जातील. पण वास्तूनुसार घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. कारण यामुळे तुमच्या कामात अनेक प्रकारचे अडथळे येत राहतात. म्हणून ते दुरुस्त करा किंवा काढून टाका.

अधिक वाचा : नोरा फतेहीच्या साडीतील कातिल अदा

जुने रद्दी वर्तमानपत्र: (newspapers) 

 वास्तुशास्त्रानुसार जुनी रद्दी वर्तमानपत्रे देखील घरात कधीही ठेवू नयेत. कारण त्यात साचलेली धूळ आणि साचलेली मातीची घाण आरोग्यावर वाईट परिणाम करते. त्यामुळे गरज नसेल तर जुनी वर्तमानपत्रे ताबडतोब काढून टाका.

 खराब कुलूप : (door locks) 

 घरात पडलेले खराब कुलूप त्वरित काढून टाकावे. कारण खराब कुलुपप्रमाणे माणसाची प्रगतीही थांबते. त्यामुळे एकतर घरातील कुलूप दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका.

अधिक वाचा : उर्फी म्हणते, मी एके दिवशी न्यूड होईन!

 खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू: (elections equipment) 

अनेक वेळा खराब चार्जर, केबल, बल्ब अशा अनेक वस्तू घरात पडून असतात. परंतु वास्तूनुसार घरातील सदोष इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींसोबतच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे घरातून खराब झालेल्या विजेच्या वस्तू ताबडतोब काढून टाका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी