Vat Savitri Vrat 2022: वटपौर्णिमेच्या दिवशी करा अशी पुजा, पतीच्या प्राणांवरील संकटं होतील दूर

ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तीन दिवसांपूर्वी त्रयोदशीला वट पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. यंदा ३० मे रोजी ही वटपौर्णिमा साजरी होणार आहे. यावेळी वडाच्या झाडाची पुजा केली जाते.

vat savitri 2022
वट-सावित्री व्रत पूजा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तीन दिवसांपूर्वी त्रयोदशीला वट पौर्णिमा साजरी केली जाते.
  • या पौर्णिमेला सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात.
  • यंदा ३० मे रोजी ही वटपौर्णिमा साजरी होणार आहे. यावेळी वडाच्या झाडाची पुजा केली जाते.

Vat Savitri Vrat 2022 Date Puja Shubh Muhurat: मुंबई : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तीन दिवसांपूर्वी त्रयोदशीला वट पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. यंदा ३० मे रोजी ही वटपौर्णिमा साजरी होणार आहे. यावेळी वडाच्या झाडाची पुजा केली जाते. या दिवशी विवाहित महिलांनी उपवास केल्यास कुंडलीतील वैधव्य योग दुरू होतो. तसेच पतीच्या प्राणांवार आलेले संकत दूर होते अशीही मान्यता आहे.

अशी करा पुजा वटसावित्रीची पुजा

वटवृक्षाला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. देव वर्षानुवर्ष वडाच्या झाडाची रक्षा करतात. वडाच्य झाडातील मुळात ब्रम्हाचा आणि वडाच्या झडात भगवान शंकराचा वास असतो असे सांगितले जाते. सुवासिनींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला कुंकू वहावे. चणे, गुण आणि तुप अर्पण करावे. झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. वडाच्या झाडाच्या पानांचा हार घालून वटसावित्रीची कथा ऐकावी. वडाच्य झाडाला १०८ वेळी फेरी मारावी. यावेळी हळद लावलेला दोरा झाडाला लावावा. त्यानंतर सावित्रीमातेची आराधना करून अर्घ्य दान करावे.

या मंत्राचा करा जाप

वट सावित्रीची पुज करताना 'अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते, पुत्रान पौत्रांश्च सौख्यं च गृहाणाध्यं नमोस्तुते।।' हा मंत्र जाप करा. वटसावित्रीच्या दिवशी पुजा केल्यानंतर कुंडलीतील वैधव्य योग दूर होतो. तसेच नवरा बायकोचे नाते अधिक दृढ होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी