Astrology 2022 : सूर्य आणि शुक्राची लवकरच युती, या राशींना होणार लाभ...पडेल पैशाचा भरपूर पाऊस!

Horoscope 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक राशीचे एक स्वतंत्र महत्त्व असते. प्रत्येक ग्रहाच्या दशेचा प्रत्येक राशीवर वेगळा परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहदशा बदलण्यावर विशेष लक्ष दिले जाते. दर महिन्याला काही ग्रह राशी बदलतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो. ग्रहांच्या स्थितीतवर राशींची दशा (Horoscope) अवलंबून असते. ऑगस्टअखेर अनेक राशींची दशा बदलणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला शुक्र ग्रह आपली राशी बदलणार आहे.

Astrology 2022
राशिभविष्य 2022 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक ग्रहाच्या दशेचा प्रत्येक राशीवर वेगळा परिणाम होत असतो.
  • 31 ऑगस्टला शुक्र ग्रह आपली राशी बदलणार आहे.
  • शुक्र आणि सूर्याचा संयोग 17 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

Surya-Shukra Yuti 2022 : नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक राशीचे एक स्वतंत्र महत्त्व असते. प्रत्येक ग्रहाच्या दशेचा प्रत्येक राशीवर वेगळा परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहदशा बदलण्यावर विशेष लक्ष दिले जाते. दर महिन्याला काही ग्रह राशी बदलतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो. ग्रहांच्या स्थितीतवर राशींची दशा (Horoscope) अवलंबून असते. ऑगस्टअखेर अनेक राशींची दशा बदलणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला शुक्र ग्रह आपली राशी बदलणार आहे. या दोन ग्रहांच्या एकत्र (Venus And Sun Conjunction)येण्यामुळे अनेक राशींवर परिणाम होईल. अर्थातच हा परिणाम सकारात्मक असणार आहे. (Venus And Sun Conjunction very soon, these zodiac signs will get financial benefits)

अधिक वाचा : Maruti CNG Car : या आहेत मारुतीच्या 5 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी कार...किंमतीदेखील सर्वात कमी

सुर्य आणि शुक्र यांची युती (Venus And Sun Conjunction)

31 ऑगस्टला शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 17 सप्टेंबरपर्यंत सूर्य सिंह राशीत आहे. शुक्र सिंह राशीत प्रवेश करत असल्यामुळे सूर्य आणि शुक्र यांची युती होणार आहे. या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. शुक्र आणि सूर्याचा संयोग 17 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. कारण 17 सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करेल.

या राशींना होणार जबरदस्त फायदे -

कर्क - ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि सूर्याची युती खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. एवढेच नाही तर पैशाचा ओघही वाढेल. कर्क राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. या राशीतील लोकांसाठी पैसे मिळवण्याचे मार्ग उपलब्ध होतील.

कुंभ - शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होईल. या काळात आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. पैसा जमा करण्यात यश मिळेल. कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ असणार आहे. एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : Weight Loss Success Story : कधी काळी लठ्ठपणामुळे या अभियंत्याला घालावी लागत होती लुंगी, आता घटवले 27 किलो वजन...पाहा कसे

वृषभ - शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. या दरम्यान व्यक्तीचे मन अभ्यास आणि लेखनात गुंतलेले असेल. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात बरेच फायदे होतील. या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राचा योग लाभदायक ठरणार आहे.

अधिक वाचा : First Iphone Auction : पहिल्यावहिल्या आयफोनचा लिलाव, इतक्या लाखांची लागली बोली

मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे संवाद कौशल्य वाढेल. या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळेल आणि तुम्ही चांगले स्थान प्राप्त कराल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आणि कार्यालयामध्ये किंवा जिथे काम करत असतील तिथे तुमची कामगिरी उत्तम राहील.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी