मुंबई: Shukra Gochar in Singh 2022: प्रत्येक ग्रह (planet) ठराविक कालावधीनंतर आपली राशीमध्ये बदल करत असतो. ज्योतिष शास्त्रात (astrology) असं सांगण्यात आलं आहे. आता 3 दिवसांनंतर 31 ऑगस्ट 2022 रोजी शुक्र (Venus) ग्रह भ्रमण करणार आहे. शुक्र आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम जीवनातील संपत्ती, सुख-सुविधा, प्रेम-रोमान्सवर होतो. यावेळी सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी चांगला काळ घेऊन येत आहे. या राशीच्या लोकांना शुक्राच्या कृपेने धनप्राप्ती होणार आहे. जीवनात सुख-सुविधा आणि संपत्तीत वाढ होणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शुक्राचे संक्रमण शुभ सिद्ध होणार आहे.
शुक्र संक्रमण खालील दिलेल्या राशींना भरभरून पैसा देणार आहे.
तूळ: शुक्राचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. या लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: जे चित्रपट, माध्यम आणि ग्लॅमर या क्षेत्रांशी निगडीत आहेत, त्यांना खूप फायदा होणार आहे. नवीन नोकरी मिळेल. ज्या प्रतिष्ठेची आणि पैशाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, ते तुम्हाला मिळणार आहे.
अधिक वाचा- Oily dandruff कंटाळलात?, मग नक्की ट्राय करा 'या' Tips
कर्क : शुक्राच्या राशीतील बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. त्यांना अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळू शकतात. तुमच्या एका शब्दाच्या जोरावर कामे होतील. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. हा काळ तुम्हाला भरपूर पैसा आणेल.
वृश्चिक : सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्तम काळ घेऊन येणार आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर आहे. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. या राशीच्या लोकांच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. कामात सुधारणा होईल.
डिसक्लेमर: 'या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, युजर्सने ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. शिवाय, युजर स्वत: त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल.'