Vinayak Chaturthi : मुंबईः विनायक चतुर्थीनिमित्त (Vinayak Chaturthi) गणपतीची पुजा केली जाते. आज (१ ऑगस्ट २०२२) विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपती बाप्पाची मनापासून आराधना केल्यास मनातील इच्छापूर्ण होते असे सांगितले जाते. . विनायक चतुर्थी निमित्त प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा. पूजा (Puja) करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा. दिवसभर उपवास करावा. दूध, फलाहार असा हलका आहार घ्यावा. राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अंमल करावा. (Vinayak Chaturthi 2022 share marathi wishes on Facebook, Instagram, WhatsApp, Twitter, and other Social Media)
हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा..
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा..
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा