Vinayak Chaturthi 2022 Wishes Marathi । मुंबई : प्रत्येक महिन्यात दोन्ही बाजूंची चतुर्थी तिथी गणपतीला (Vinayak Chaturthi 2022) समर्पित केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. दर महिन्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची पुजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. विनायक चतुर्थी निमित्ताने आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मीडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा द्या. (vinayak chaturthi may 2022 messages in marathi share on whatsapp and social media)
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
विनायक निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
ॐ गं गणपतये नमो नम:
श्री सिद्धिविनायक नमो नम:
अष्टविनायक नमो नम:
गणपती बाप्पा मोरया ...