weekly horoscope साप्ताहिक राशी भविष्य १७ ते २३ एप्रिल २०२२, वाचा कसा जाईल हा आठवडा

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • साप्ताहिक राशीभविष्य १७ ते २३ एप्रिल २०२२
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

साप्ताहिक राशी भविष्य 16 To 23 April 2022 : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा.

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: कतृत्वावर भर द्या. सावध राहा. मनाला पटल्याशिवाय कृतीची घाई नको. घरच्यांना वेळ द्या. जबाबदाऱ्या पार पाडाल. वाद टाळणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग - पिवळा
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: तब्येत जपा. व्यवहार विचारपूर्वक करा. ज्येष्ठांना मान द्या. जोडीदाराला वेळ द्या. शुभ रंग - आकाशी
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. मित्रांची साथ लाभेल. कामावर लक्ष केंद्रीत करा. प्रश्न सुटायला वेळ लागेल पण तो नक्की सुटेल. नम्रपणे वागणे लाभदायी ठरेल. तब्येत जपा. शुभ रंग - किरमिजी
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: शब्द जपून वापरा. संवादातून प्रश्न सोडवा. स्वभावाला परिस्थितीनुसार मुरड घाला. हुशारीने प्रगती कराल. समतोल राहणे हिताचे. अतिरेक टाळा. प्रत्येक महत्त्वाची कृती विचारपूर्वक करा. शुभ रंग - किरमिजी
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: कामाचे नियोजन हिताचे. क्षमतेचा विचार करुन आश्वासन द्या. कायदा पाळणे हिताचे. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. लहरी स्वभावाला थोडी मुरड घालणे आवश्यक. शुभ रंग - पोपटी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: वाद टाळा. चर्चेतून मार्ग काढू शकाल. प्रयत्नाने यश मिळवाल. जीवन जगण्याचे व्यवस्थापन करणे हिताचे. अतिरेक टाळा. शुभ रंग - सोनेरी
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: तब्येत जपा. आर्थिक लाभ होईल. कर्ज देणे टाळा. गुंतवणुकीचे नियोजन करा. घरच्यांना आणि जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. क्षमता ओळखून कृती करा. शुभ रंग - जांभळा
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: हुशारीने प्रश्न सोडवाल. महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल. मतप्रदर्शनाची घाई नको. प्रयत्नाने यश मिळेल. नम्रतेने वागा. कृती करण्याआधी त्यामागील कारण समजून घ्या. वाद टाळा. शुभ रंग - पोपटी
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती करणे हिताचे. आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती होईल. प्रसंगी स्वतःला बदलणे फायद्याचे. वाद टाळा आणि सलोखा राहखण्यावर भर द्या. हिशोबी वृत्ती जपा. संयमाने वागा. शुभ रंग - गुलाबी
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: तब्येत जपा. डोळ्यांची काळजी घ्या. ज्येष्ठांची काळजी घ्या आणि त्यांचा मान राखा. हुशारीने प्रश्न सोडवाल. चर्चेतून मार्ग काढाल. प्रयत्नाने प्रगती होईल. क्षमता ओळखून कृती करणे लाभाचे. शुभ रंग - निळा
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: माणसं जपा, माणसं जोडा. घर आणि काम यात समतोल राखणे आवश्यक. हाती आलेली जबाबदारी चोख पार पाडाल. प्रगती होईल. अतिरेक टाळा आणि संयम राखा. शुभ रंग - निळा
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: शब्दांनी इतरांवर प्रभाव पाडाल. हुशारीने प्रगती कराल आणि अनेक प्रश्न सोडवाल. रागावर नियंत्रण मिळवणे आणि वाद टाळणे फायद्याचे ठरेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारुन पार पाडाल. कामावर लक्ष केंद्रीत करू शकाल. शुभ रंग - आकाशी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी