साप्ताहिक राशी भविष्य 28 जून ते 4 जुलै: 'या' राशींसाठी आठवडा ठरणार संघर्षाचा

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
  • 28 जून ते 4 जुलैचं राशी भविष्य 
  • पाहा कोणत्या राशी साठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 28 June to 4 July 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात योजनांचा विस्तार करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असेल. व्यवसायात चांगला लाभ होईल. २९ जूननंतर तुम्ही नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न कराल आणि यशस्वी व्हाल. गरिबांना गहू, कपडे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: या आठवड्यात २८ जूननंतर नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. गुरुवार आणि मंगळवारी अन्न दान करा. ३० जूननंतरचा काळ व्यावसायिकांसाठी चांगला असेल. या आठवड्यातील शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: २८ आणि २९ जून रोजी तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. २९ जूननंतरचा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. शुक्रवारी गरिबांना अन्न दान करा. या आठवड्यातील शुभ रंग - आकाशी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: नोकरी बदलायची असल्यास २८ जूननंतरचा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. २९ जून रोजी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मित्रांच्या भेटी-गाठी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: घरात लवकरच शुभ कार्य होईल. नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य ठणठणीत राहील. या आठवड्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात मित्रांचा मोठा पाठिंबा मिळेल. या आठवड्यातील शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात नवा व्यवसाय सुरू होईल. एखाद्या व्यक्तीसोबत नवीन व्यवसाय सुरू होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला असेल. सरकारी कामे मार्गी लागतील. या आठवड्यातील शुभ रंग - हिरवा आणि निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: रखडलेली कामे, योजना मार्गी लागतील. चांगला धनलाभ होण्याचा योग आहे. दररोज सकाळी पूजा केल्यावर गरिबांना अन्न दान करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी २८ जून ते ३० जून हा कालावधी खूपच चांगला असणार आहे. या आठवड्यातील शुभ रंग - पांढरा आणि निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: या आठवड्यात एक महत्वाचा निर्णय घ्याल आणि त्यााचा लाभ हा भविष्यात तुम्हाला नक्कीच मिळेल. व्यवसायात संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल. या आठवड्यातील शुभ रंग - पिवळा. 
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी खूपच आनंददायी असेल. २८ ते ३० जून या कालावधीत अनेक कामे मार्गी लागतील. मित्रांच्या मदतीने आणि सहकार्याने रखडलेले सरकारी काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला असेल. या आठवड्यातील शुभ रंग - पिवळा आणि पांढरा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: २८ जून ते २ जुलै या कालावधीत व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. या आठवड्यातील शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: आठवड्याच्या सुरूवातीपासूनच तुम्हाला चांगले यश मिळण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे. भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक कामे सुरू कराल. २९ जूननंतरचा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला असेल. या आठवड्यातील शुभ रंग - लाल.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी संघर्षाचा जाण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळतील. अन्न, कपडे दान करा. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कामे मार्गी लागतील. या आठवड्यातील शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी