Importance of Navratri: शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या त्यामागील रंजक कथा

Religious Importance of Navratri: नवरात्रीला (Navratri) माँ दुर्गेचा पर्व (Maa Durga)असं म्हणतात. नवरात्र वर्षातून दोनदा साजरी केली जाते, चैत्र नवरात्र (Chaitra Navratri) आणि शारदीय नवरात्र. (Sharadiya Navratri) यादरम्यान नऊ दिवस घरोघरी देवीची पूजा केली जाते.

Religious significance of Sharadiya Navratri
नवरात्रीची आख्यायिका 
थोडं पण कामाचं
  • नवरात्रीमध्ये नऊ दिवस, भक्त दुर्गा देवीच्या (Durga Devi) विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते.
  • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर स्वच्छ केले जातात. तिथे कलशाची (घटाची) स्थापना केली जाते.
  • नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे पूजा केली तर कठिणातलं ही कठिण काम मार्गी लागतं असा समज आहे.

मुंबई:  Importance Of Shardiya Navratri In Marathi:   नवरात्रीला (Navratri)  माँ दुर्गेचा पर्व (Maa Durga)असं म्हणतात. नवरात्र वर्षातून दोनदा साजरी केली जाते, चैत्र नवरात्र (Chaitra Navratri)  आणि शारदीय नवरात्र. (Sharadiya Navratri) यादरम्यान नऊ दिवस घरोघरी देवीची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे पूजा केली तर कठिणातलं ही कठिण काम मार्गी लागतं असा समज आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस, भक्त दुर्गा देवीच्या (Durga Devi) विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते.  हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर स्वच्छ केले जातात. तिथे कलशाची (घटाची) स्थापना केली जाते.  जाणून घेऊया काय आहे नवरात्रीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व.

नवरात्रीचा अर्थ काय (What is the meaning of Navratri?)

नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ 'नऊ रात्री' असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये, तीन देवी - महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि दुर्गेच्या नऊ रूपांना नवदुर्गा म्हणतात. दुर्गा म्हणजे जीवनातील दु:ख दूर करणारी. नवरात्र हा एक महत्त्वाचा प्रमुख सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.  नवरात्रीच्या काळात  देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. 

अधिक वाचा-  घरबसल्या केसांना करा सुंदर आणि मजबूत; घरगुती सोपे उपाय

नवरात्रीची आख्यायिका

नवरात्राबाबात दोन पौराणिक कथा सांगण्यात येतात. त्यातली पहिल्या पौराणिक कथेबद्दल सांगायचं झालं तर महिषासुर नावाचा एक दैत्य ब्रम्हदेवाचा भक्त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न केलं. त्यानंतर त्यानं ब्रम्हदेवांकडून वरदान मागून घेतलं. ब्रम्हदेवांनी त्याला वरदान दिलं की, पृथ्वीवर राहणारा कोणताही मनुष्य किंवा, देव तसंच दानव यापैकी कोणीही मारू शकणार नाही. ब्रम्हदेवांनी दिलेल्या वरदानानंतर महिषासुराला त्याचा गर्व झाला. त्यानंतर त्यानं पृथ्वी, स्वर्ग आणि पातळावर हाहाःकार माजवायला सुरूवात केली. महिषासुराची दहशत पसरू लागली. त्याच्या या कृत्यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी  ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेकडे साकडं घातलं.


यानंतर दुर्गा देवीनं नऊ दिवस महिषासुरासोबत लढाई केली आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. म्हणूनच दुर्गा देवीला महिषासुर मर्दिनी असंही म्हटलं जातं. वाईट कृत्याचा वध करून त्यावर विजय मिळवणं, म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. नऊ दिवस देवीनं केलेली लढाई आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठी नवरात्रौत्सव साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचं पुराणात सांगितलं गेलं आहे. 

दुसरी पौराणिक कथा 

दुसऱ्या पौराणिक कथेत असं म्हटलं आहे की,  लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवान श्रीराम यांनी देवीची मनापासून आराधना केली होती. श्रीराम यांनी 9 दिवस देवीची पूजा केली, तिची आराधना आणि नामस्मरण केलं आणि देवीला प्रसन्न केले होते. त्यानंतर देवी श्रीरामा यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यानंतर देवीनं लंकाविजयचा आशीर्वाद दिला असं सांगितलं जातं. तर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि लंकेवर विजय प्राप्त केला. अशाप्रकारे रामानेही रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी