स्वप्नात तुम्ही स्वत:ला पळताना आणि पडताना बघितलंय का? जाणून घ्या याचा अर्थ

धर्म-कर्म-भविष्य
Updated Nov 26, 2020 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेकदा आपण स्वप्नामध्ये कुठेतरी पळत असतो, अथवा कुठेतरी अचानक पडतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की अशी स्वप्ने का येतात? खरंतर ही स्वप्ने काही संकेत देत असतात. 

sleep
स्वप्नात तुम्ही स्वत:ला पळताना आणि पडताना बघितलंय का? 

थोडं पण कामाचं

  • झोपेत असताना येणारी स्वप्ने काही संकेत देत असतात
  • स्वप्नात पाणी पडणे म्हणजे एखाद्या संकटाची चाहूल मानली जीते
  • स्वप्नात स्वत:ला उडताना पाहिल्यास समस्यांपासून मुक्त होण्याचे संकेत असतात. 

मुंबई: अनेकदा स्वप्ने(dreams) मनुष्याला त्याच्या भविष्यात येणारे संकेत देत असतात. स्वप्न मनुष्याला त्याच्या समस्यातून बाहेर पडण्याचे अथवा समस्येमध्ये अडकण्याचे संकेत देतात. या स्वप्नांचा अर्थ जर वेळेतच आपल्याला समजला तर येणाऱ्या समस्या दूर करणे सोपे असते. अनेकदा असे होते की आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वप्नात आलेल्या गोष्टींबद्दल विचार करू लागतो. जर तुम्ही या स्वप्नाचा अर्थ वेळीच जाणून घेतला तर अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. अनेकदा स्वप्नात आपण एखाद्या उंचीवरून खाली पडताना अथवा स्वत:ला पळताना बघतो. यामागे काही अर्थ लपलेला असतो. जाणून घ्या या स्वप्नांचा अर्थ

स्वप्नात उंचीवरून खाली पडणे

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला उंचीवरून खाली पडताना पाहत असा अथवा पडल्यानंतर तुमचे मन दु:खी होत असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात एखादी समस्या येणार आहे. जर तुम्ही एखाद्या उंचीवरून खाली पडून स्वत:ला खुश दिसत असाल तर याचा अर्थ आहे की तुम्ही एखाद्या समस्येतून बाहेर पडत आहात. 

स्वप्नात पळताना दिसणे

स्वप्नातजर तुम्ही एखाद्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पळत आहात अथवा दुसऱ्या कारणाने पळच असाल याचा अर्थ तुम्ही समस्यांपासून पळ काढत आहात. एखाद्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पळ काढणे याचा अर्थ तुमच्यामागे कोणीतरी षडयंत्र रचत आहे. यावेळेस तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. पळणे हे तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता दाखवून देते. 

स्वप्नात हवेत उडणे

स्वप्नात स्वत:ला हवेत उडताना पाहणे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. म्हणजेच तुम्ही समस्यापासून मुक्त व्हाल. 

स्वप्नात छत खाली पडताना पाहणे

स्वप्नात जर तुम्ही छत खाली पडताना पाहिले तर चिंता करण्याची गरज नाही याचा अर्थ तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. 

स्वप्नात नदीत पडताना दिसणे

जर तुम्ही स्वत:ला नदीत पडताना दिसत असाल तर समजून घ्या की हा चांगला संकेत नाही. हे स्वप्न तुम्हाला एखाद्या संकटात ढकलू शकते. अशातच तुम्हाला तुमची कामे अतिशय सजगतेने केली पाहिजेत.

स्वप्नात रडताना दिसणे

स्वप्नात तुम्ही स्वत: ऱडत अथवा जोरजोरात ओरडत असाल तर याचा अर्थ तुम्ही भूतकाळातून स्वत:ला बाहेर काढू शकलेला नाहीत. याचा आणखी एक अर्थ म्हणजे तुम्हाला बेचैनी, दु:ख, त्रास सारख्या भावनांनी घेरले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी