Lord Ganesha Intresting Things: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सवाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. गणेश चतुर्थीचे संपूर्ण दहा दिवस भक्त बाप्पाच्या (Ganpati Bappa Morya) भक्तीमध्ये तल्लीन असतात. यंदाही गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या तयारीत भाविक मोठ्या उत्साहात व्यस्त आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी साजरी होणार आहे. (when is ganesh chaturthi 2022 know these 11 interesting things related to lord ganesha)
गणेश चतुर्थी हा सण बाप्पाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. दहा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. 10 दिवसांच्या पूजेनंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते. तेव्हा बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावा, अशी भक्तांची इच्छा असते. गणेश चतुर्थीच्या आधी जाणून घ्या गणपतीशी संबंधित 11 रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी.
अधिक वाचा: Ganesh Chaturthi 2022 : डाव्या की उजव्या, नेमकी कोणत्या बाजूच्या सोंडेच्या गणपतीची करावी पूजा?
गणपती बाप्पाशी संबंधित 11 रंजक गोष्टी
गणेश चतुर्थी हा सण भाविकांमध्ये विशेष मानला जातो. मात्र यंदा गणेश चतुर्थीचा दिवस अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण यंदा गणेश चतुर्थी बुधवार 31 ऑगस्ट रोजी येत आहे. बुधवार हा गणपतीच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि तो त्याचा आवडता दिवस आहे.