तुळस लावताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, नाहीतर...

Tulsi vastu tips: तुळशीच्या झाडाला देवी मानलं जाते. म्हणून तुळशीचं रोप लावताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ज्या आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकतात.

tulsi
तुळस लावताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, नाहीतर...  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

 • तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र मानली जाते
 • रोज संध्याकाळी तुळशीवर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं.
 • तुळशीजवळ काटेरी झाडे लावू नका

मुंबई: तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं. याशिवाय तुळशी घरासाठी फायदेशीर मानली जाते. कार्तिक महिन्यात तुळशीला विशेष महत्त्व असतं आणि दिवे लावून त्याची पूजा देखील केली जाते.

तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तुळस ही आपल्या दारी असणं केव्हाही चांगलंच आहे. 

जर आपल्याला देखील तुळस असेल किंवा ती लावायची असल्यास काही टिप्स नक्की लक्षात ठेवा:

 1. तुळस ही जर आपण बाल्कनी किंवा खिडकीमध्ये लावत असाल तर ती उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावली पाहिजे. याशिवाय तुम्ही अंगणातही तुळस लावू शकता.
 2. हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महात्म्य आहे. तिला देवी म्हणून देखील मान्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा की तिच्या आजूबाजूला इतर फुलझाडे असायला हवी. कॅक्टस किंवा काटेरी झाडाजवळ तुळस लावू नये.
 3. दररोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा. असे म्हणतात की दररोज दिवा लावल्यास त्या घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते.
 4. वास्तुनुसार तुळस ही नेहमी एका कोपऱ्यात लावावी. ती अंगणाच्या मध्यभागी लावू नये.
 5. वास्तुशास्त्रानुसार तुळस वास्तुदोष दूर करते, म्हणून तुळस त्याच ठिकाणी लावावी जिथे वास्तूदोष असेल.
 6. तुळस ही स्वच्छ ठिकाणी ठेवावी कारण धुळीमुळे तिचा प्रभाव कमी होतो.
 7. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणत्याही प्रकारचा वास्तू दोष असल्यास त्याठिकाणी तुळशीचं रोप लावावं.
 8. तुळशीच्या आजूबाजूला झाडू किंवा डस्टबिन ठेऊ नये.
 9. याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की घरात आपल्याला एकापेक्षा जास्त तुळशीची लागवड करायची असेल तर त्याची संख्या 3, 5, 7 अशी विषम प्रमाणात असावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी