Akshaya Tritiya 2023 Car Bike Shopping: अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तिथी शनिवार, 22 एप्रिल रोजी साजरी आली आहे. काही भागात हा सण आखा तीज म्हणूनही ओळखला जातो. अक्षय्य तृतीयेला साडेतीन मुहूर्तापैकी शुभ कार्य आणि खरेदीसाठी खूप शुभ मुहूर्त मानला जातो. (Which color vehicle will be lucky to buy on Akshaya Tritiya)
दिवाळीप्रमाणेच अक्षय्य तृतीयेलाही देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात यश आणि सुख समृद्धी घेवून येतो. या दिवशी लोक अनेक नवीन वस्तू, कार किंवा घर खरेदी करतात. जर तुम्ही अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जाणून घेऊ शकता की कोणत्या रंगाची कार तुमच्यासाठी लकी ठरणार आहे.
अक्षय्य तृतीयेला तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. म्हणूनच तुम्ही या दिवशी लाल रंगाची कार खरेदी करू शकता, हा रंग नशीबाचे प्रतीक मानला जातो. या रंगामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या दरम्यान काळ्या किंवा तपकिरी रंगीची कार खरेदी करू नका.
अधिक वाचा: Surya Grahan 2023: 10 वर्षांनंतर या तीन राशींला ग्रहण, सूर्यग्रहण टाळण्यासाठी करा हे उपाय
जर वृषभ राशीचे लोक अक्षय तृतीयेला कार खरेदी करत असतील तर तुम्ही निळ्या, क्रीमी किंवा पांढऱ्या रंगाची कार खरेदी करावी. शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हे तीन रंग तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील आणि तुमचे जीवन सुसह्य करतील. त्याच वेळी, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची वाहने घेणे टाळा.
मिथुन राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करायची आहे, तर तुमच्या कारसाठी हिरवा किंवा राखाडी रंग लकी असेल. या राशीचा स्वामी बुध आहे. या रंगाची वाहने खरेदी केल्यास तुमचे मन शांत आणि एकाग्र राहील. यासोबतच तुमचे कामावरही लक्ष राहिल.
अधिक वाचा: Kalashtami April 2023 : कालाष्टमी म्हणजे काय? काय आहे कालाष्टमीचे नियम?
चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे आणि जर तुम्हाला अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी पांढरा, सिल्वर, मलई आणि पिवळा रंग सर्वोत्तम असेल. हे रंग तुमचे मन शांत ठेवतील.
सिंह राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करताना राखाडी रंगाची निवड करावी. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हा रंग तुमच्या वाहनासाठी लकी ठरेल. या रंगांची कार घेतल्यास जीवनात संतुलन राहील.
कन्या राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करायची असेल तर पांढरा, तपकिरी, हिरवा आणि निळा रंग तुमच्यासाठी लकू ठरेल. बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हे रंग तुमच्या कारसाठी सर्वोत्तम ठरतील. पण तुम्ही लाल रंगाची कार घेणे टाळा.
तूळ राशीचे लोक अक्षय तृतीयेला कार खरेदी करण्याची योजना आखत असेल ते निळा, पांढरा, क्रीम रंग निवडू शकतात. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे हे रंग जीवनात शुभफळ आणतात आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात.
वृश्चिक राशीचा प्रमुख ग्रह मंगळ आहे. अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करत असाल तर लाल आणि पांढऱ्या रंगाची कार घेणे चांगले आहे. हे रंग तुम्हाला उत्साही आणि धैर्यवान बनवतील. कोणत्याही संकटासाठी प्रेरणा देतील. तुम्ही पांढऱ्या रंगाचे वाहन घेणे टाळा.
धनु राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करायची आहे, तर बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे तुम्ही कारसाठी पिवळा, केशरी, सिल्वर किंवा भगवा रंग निवडू शकता. हे रंग तुम्हाला अनेक संकटांपासून वाचवतील आणि जीवनाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतील.
मकर राशीचा स्वामी शनि आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेला कार खरेदी करायची असेल तर कारसाठी काळा, निळा, राखाडी, पांढरा रंग निवडू शकता. हे रंग तुमच्या कारसाठी शुभ असतील आणि तुम्हाला त्रासांपासून दूर ठेवतील.
कुंभ राशीचे लोक अक्षय तृतीयेला कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत, तर तुमच्या कारसाठी शुभ रंग राखाडी, गडद निळा, काळा, तपकिरी असेल. शनि तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हे रंग तुम्हाला प्रौढ बनवतात आणि कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देतात.
अधिक वाचा: आजचे राशी भविष्य 13 एप्रिल : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होण्याचे संकेत
मीन राशीचे लोक अक्षय तृतीयेला कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत, तर तुम्ही कारसाठी पिवळा, केशरी, पांढरा, भगवा, सोनेरी रंग निवडू शकता. तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रह देवतांचा स्वामी आहे, त्यामुळे हे रंग तुम्हाला शुभ परिणाम देतील आणि नशिबाचे दरवाजे उघडतील.
टीप: ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. या सामग्रीचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.