Vastu Tips: जेवण करताना या दिशेला तोंड केल्यास बनाल श्रीमंत

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 23, 2022 | 14:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips: वास्तुशास्त्रात प्रत्येक काम करण्यासाठी योग्य दिशा आणि काही नियम सांगितले आहेत. यानुसार एखादी व्यक्ती योग्य दिशेला तोंड करून जेवल्यास त्याला खूप लाभ होतील. 

eating food
Vastu Tips: जेवण करताना या दिशेला तोंड केल्यास बनाल श्रीमंत 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर उत्तर दिशेला तोंड करून जेवा.
  • ज्या लोकांचे आरोग्य चांगले नसते त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवले पाहिजे असे केल्याने आरोग्य सुधारते. 
  • ज्या लोकांना अकाली मृत्यूची भीती सतावत असते तसेच कुंडलीत मारक ग्रह असेल तर अशा लोकांनी पूर्व दिशेला तोंड करून जेवावे.

मुंबई: वास्तुशास्त्रात(vastushastra0) काही नियमांचे पालन केल्याने जीवनात धन-दौलत, सन्मान, आनंदी कुटुंब हे सर्व मिळवता येते. यासाठी वास्तुशास्त्रात झोपणे, वाचणे, काम करणे, पुजा-पाठ करणे, भोजन करण्याबाबतचे काही नियम सांगितले आहेत. यानुसार ती व्यक्ती योग्य दिशेला तोंड करून जेवल्यास त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारे. तसेच अनेक लाभही होतात. तर चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्यास अनेक आजारांचे कारण ठरू शकते. सोबतच मनात अकाली मृत्यूची भीतीही राहते. Which Direction is good for eating food

अधिक वाचा - लेकरांना कडेवर घेऊन करते फूड डिलिव्हरी

या दिशेला तोंड करून जेवल्यास शुभ

वास्तुशास्त्रात विविध हेतूंच्या पूर्ततेसाठी भोजन करण्यासाठी दिशांबाबत माहिती दिली आहे. सोबत त्या दिशेबाबतही सांगितले आहे जिथे तोंड करून जेवल्यास अशुभ मानले जाते. 

धनवान बनण्यासाठी या दिशेला तोंड करून जेवा

वास्तुशास्त्रानुसार जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर उत्तर दिशेला तोंड करून जेवा. असे केल्याने पैशांची तंगी जाणवत नाही. तसेच घरात सुख-समृद्धी वाढते. 

चांगल्या आरोग्यासाठी 

ज्या लोकांचे आरोग्य चांगले नसते त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवले पाहिजे असे केल्याने आरोग्य सुधारते. 

अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी 

ज्या लोकांना अकाली मृत्यूची भीती सतावत असते तसेच कुंडलीत मारक ग्रह असेल तर अशा लोकांनी पूर्व दिशेला तोंड करून जेवावे. असे केल्याने त्यांचे आरोग्यही सुधारेल आणि अकाली मृत्यूची भीती कमी होईल. 

अधिक वाचा - खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवतील चिरतरूण

भोजन करताना या दिशेला तोंड करू नये

ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेवताना कधीही दक्षिण दिशेला तोंड करू नये. असे केल्याने नकारात्मक उर्जा वाढते. या दिशेला भोजन करणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले गेले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी